सेक्सवर्धक औषधाच्या नावाखाली अमेरिकन नागरीकाची फसवणूक


सेक्सवर्धक औषधाच्या नावाखाली अमेरिकन नागरीकाची फसवणूक
SHARES
सेक्स ताकद वाढवण्यास मदत करणाऱ्या औषधाच्या नावाखाली अमॆरिकन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.मजफ्फर शेख (३७), मोहम्मद अल्ताफ मेमन (३१), मोहम्मद उसामा चौधरी (२९) अशी अटक आरोपींची नावे आहेत.  गुन्हे शाखेच्या  मालमत्ता विभागाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी तिघांना अटक केली असुन, याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 मजफ्फर शेख (३७), मोहम्मद अल्ताफ मेमन (३१), मोहम्मद उसामा चौधरी (२९) अशी अटक आरोपींची नावे आहेत. अमेरिकन नागरिक असल्याचे भासवून प्रतिबंधीत असलेल्या वायग्रा सारख्या औषधांची ऑनलाईन विक्री साठी पैसे घेऊन फसवणूक करणाऱया टोळीला मालमत्ता कक्षाने दक्षिण मुंबईतील एका काॅल सेंटरवर छापा टाकून अटक केली आहे. एम. एस इंटरप्रायजेस, २८ छोटा सोनापूर, एम. एस. अली मार्ग याठिकाणी इंटरनेट कॉलद्वारे अमेरिकन नागरिकांना दूरध्वनीकरून आरोपी स्वतः अमेरिकन असल्याचे भासवत व त्यांचा विश्वास संपादन करतात, अशी माहिती मालमत्ता कक्षाच्या पोलिसांना मिळाली होती.

 त्यानंतर वायग्रा, सिआलिय, लिव्हेट्रा इत्यादी भारतात बंदी असलेल्या सेक्स वर्धक औषधे ऑनलाईन विक्री करण्याचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करीत आहेत. या माहितीच्या  आधारे पोलिसांनी छापा टाकून तिघा आरोपींना अटक केली. तर याचा अधिक तपास सुरु आहे.
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा