'स्पा'च्या नावावर सेक्स रॅकेट

 Samta Nagar
'स्पा'च्या नावावर सेक्स रॅकेट
'स्पा'च्या नावावर सेक्स रॅकेट
See all
Samta Nagar, Mumbai  -  

कांदीवलीमधील ठाकूर व्हिलेज परिसरात स्पा मसाज अॅण्ड सलून सेंटरच्या नावाने सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा समता नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी ऑरेंज 'स्पा' ची मॅनेजर फरजाना(35) याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, 3 मुलींची पोलिसांनी सुटका केली आहे. 'स्पा'च्या नावाखाली 2500 रुपयामध्ये इथं सेक्स रॅकेट चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केल्याची माहिती समता नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप यादव यांनी दिली.

दरम्यान पोलिसांनी एका अधिका-्याला बोगस गिऱ्हाईक म्हणून या स्पामध्ये पाठवून खरचं सेक्स रॅकेट चाालत का, याची शहानिशा केली. त्यानंतर पोलिसांनी या स्पावर धाड टाकत मॅनेजरला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Loading Comments