दिग्दर्शक महेश भट यांच्या घरावर गोळीबार करणारे शार्प शूटर अटकेत

दरम्यान हे दोघेही शस्त्र तस्करीसाठी सांताक्रूझ इथं येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ९ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दोघांना अटक केली.

दिग्दर्शक महेश भट यांच्या घरावर गोळीबार करणारे शार्प शूटर अटकेत
SHARES

प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या रवी पुजारी टोळीच्या ११ हस्तकांविरोधात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोक्का) गुन्हा दाखल केला होता. मात्र यातील २ आरोपी हे वेळोवेळी पोलिसांना चकवा देण्यात यशस्वी ठरत होते. अखेर गुन्हे शाखा ९ च्या पोलिसांना या आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आलं आहे. सादीक इब्राहिम बंगाली उर्फ बंता (४०), धवल चंद्रप्पा देवमनी (२६) अशी या दोघांची नावे आहेत.


११ हस्तकांना अटक

एकेकाळी रवी पुजारीचे शार्प शूटर म्हणून प्रसिद्ध असलेल्या सादीक इब्राहिम बंगाली उर्फ बंता (४०), धवल चंद्रप्पा देवमनी (२६) या दोन हस्तकांची २००६ मध्ये महेश भट यांच्या वर करण्यात आलेल्या गोळीबारात सहभाग होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या गुन्ह्यात रवी पुजारीच्या तब्बल ११ हस्तकांना अटक केली.


पोलिसांना चकवा

मात्र, बंगाली आणि देवमनी हे भूमिगत झाले. त्यानंतर दोघांनी २००८ मध्ये ऐरोली येथील नगरसेवक देवीदास चौघुले यांच्यावर पुजारीच्या सांगण्यावरूनच जीवघेणा हल्ला केला. तसंच २०१५ मध्ये लोणावळा इथं रवी पुजारीच्या सांगण्यावरून दुहेरी हत्याकांड केलं. मात्र कालांतराने पुजारी टोळीसोबत खटके उडाल्यानंतर या दोघांनी आपली वेगळी टोळी बनवण्यास सुरूवात केली.

दरम्यान हे दोघेही शस्त्र तस्करीसाठी सांताक्रूझ इथं येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा ९ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी सापळा रचून दोघांना अटक केली. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा-

वरळीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या वृद्धाला अटक

प्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या घरात चोरी, नोकरांवर संशय



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा