प्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या घरात चोरी, नोकरांवर संशय

जुहू परिसरात राहणाऱ्या एकताने शनिवारी काही कामानिमित्त बँकेतून दीड लाख रुपये घरी आणून ठेवले होते. हे पैसे तिने तिच्या पर्समध्ये ठेवले होते. पर्स नेहमीच्या जागेवर ठेवून ती तिच्या कामात व्यस्त असताना. तिच्या नकळत अनोळखी चोराने त्यातील ६० हजार रुपये चोरले.

प्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या घरात चोरी, नोकरांवर संशय
SHARES

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र कपूर यांची कन्या निर्माती एकता कपूर हिच्या घरातून पैसे चोरीला गेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. चोराने तिच्या बॅगेतून ६० हजार रुपये चोरले असल्याची तक्रार तिने शनिवारी जुहू पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


नोकरांवर संशय

जुहू परिसरात राहणाऱ्या एकताने शनिवारी काही कामानिमित्त बँकेतून दीड लाख रुपये घरी आणून ठेवले होते. हे पैसे तिने तिच्या पर्समध्ये ठेवले होते. पर्स नेहमीच्या जागेवर ठेवून ती तिच्या कामात व्यस्त असताना. तिच्या नकळत अनोळखी चोराने त्यातील ६० हजार रुपये चोरले. ज्या कामासाठी एकताने पैसे आणले होते. ते पैसे देण्यासाठी ती गेली असताना. पैसे कमी असल्याचं तिच्या लक्षात आलं. घरातील ५ नोकरांव्यतिरिक्त त्यावेळी घरी कुणी नसल्याने तिने त्यांच्याजवळ चौकशी केली. मात्र, कुणीही कबूल न झाल्याने तिने थेट अनोळखी व्यक्तीविरोधात जुहू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.


चौकशी सुरू

या प्रकरणी जुहू पोलिसांनी एकता कपूरकडे काम करणाऱ्या पाचही संशयित नोकरांची चौकशी सुरू केली आहे. ही चोरीची रक्कम त्यांनी बँकेत किंवा जवळच्या व्यक्तीकडे ठेवायला दिल्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून पोलिसांनी संशयीत नोकरांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत का?  हे पाहण्यासाठी त्याच्या बँकेचा तपशील आणि नातेवाईकांकडे किंवा जवळच्या व्यक्तीकडे चौकशी सुरू केली आहेे. तसंच घराबाहेर शनिवारी कोण संशयीत अनोळखी व्यक्ती किंवा नोकर घराबाहेर गेले किंवा आले होते का? हे देखील पोलिस सीसीटीव्हीच्या माध्यमातून पडताळून पहात आहेत.  हेही वाचा-

वैभव राऊतसह ११ जणांविरोधात दोषारोपपत्र सादर

पडसलगीकर यांच्या मुदतवाढीला उच्च न्यायालयात आव्हानRead this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा