SHARE

 फायनान्स कंपनीच्या नावाखाली वरळी परिसरात एसआरए इमारतीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या रामिक भाई पटेल (७०) या  वृद्धाला समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून तीन मुलींची सुटका केली असून त्यातील एक मुलगी अल्पवयीन आहे. 


दोघे ताब्यात

वरळीच्या महालक्ष्मी को आॅप. सोसायटीत पटेलने तीन महिन्यांपूर्वी गजलक्ष्मी फायनान्स नावाने कंपनी सुरू केली होती. मात्र फायनान्स कंपनीच्या नावाखाली त्याने तेथे वेश्याव्यवसाय सुरू केला होता. भाड्याने घेतलेल्या खोलीत तीन खोल्या काढून हा देहविक्रीचा कारभार सुरू होता. याबाबतची माहिती स्थानिक समाजसेवकाने मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला दिली. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून पटेलला ताब्यात घेतले. पटेलच्या घरातून पोलिसांनी तीन मुलींसह दोघा जणांना ताब्यात घेतलं अाहे. या प्रकरणी समाजसेवा शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत. हेही वाचा - 

प्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या घरात चोरी, नोकरांवर संशय

वैभव राऊतसह ११ जणांविरोधात दोषारोपपत्र सादर
संबंधित विषय
ताज्या बातम्या