इंद्राणीला जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज

इंद्राणी मुखर्जीला जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीमुळे शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास तिला जे. जे. तील क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) या विभागामध्ये दाखल करण्यात आलं.

इंद्राणीला जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज
SHARES

शीना बोरा हत्याकांडप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या इंद्राणी मुखर्जीला जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. छातीत दुखत असल्याच्या तक्रारीमुळे शुक्रवारी रात्री 11.30 च्या सुमारास तिला जे. जे. तील क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) या विभागामध्ये दाखल करण्यात आलं.


इंद्राणीची प्रकृती स्थिर

यावेळी इंद्राणीच्या इसीजी, 2डी इको या चाचण्या करण्यात आल्या. शिवाय, छातीचा एक्स रे देखील काढण्यात आला. सध्या इंद्राणीची प्रकृती स्थिर असून या सगळ्या चाचण्यांचे अहवाल सामान्य असल्याने तिला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी दिली. 


२-३ दिवस सीसीयूमध्ये ठेवणार

इंद्राणीने मानेतही वेदना होत असल्याची तक्रार केल्याने तिच्या मानेचा एमआरआय आणि आणखी काही हृदयाशी संबंधित चाचण्यांच्या वैद्यकीय अहवालाची प्रतिक्षा आहे. या अहवालाच्या चाचण्या आल्यानंतर औषधोपचारांची दिशा ठरवण्यात येईल असंही डॉ. नणंदकर यांनी सांगितलं. मात्र पुढचे २-३ दिवस तिला सीसीयूमध्ये ठेवण्यात येणार असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं.


यापूर्वीही केलं होतं रुग्णालयात दाखल

प्रकृती अस्वास्थ्यामुळे इंद्राणीला दोन महिन्यांत दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्या आलं आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये तिला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी तिच्यावर अनेक वैद्यकीय चाचण्या केल्यानंतर तिने औषधांचा ओव्हरडोस घेतल्याचं निष्पन्न झालं होतं. त्यापूर्वी तिला बेशुद्धावस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा