इंद्राणी मुखर्जीला जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज


इंद्राणी मुखर्जीला जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज
SHARES

शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीला बुधवारी दुपारी जे. जे. रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तिची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. तिच्या सर्व तपासण्या केल्यानंतर तिची प्रकृती ठिक असल्याचं जे.जे. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी सांगितलं.

जे. जे. रुग्णालयाने मंगळवारी तिच्या तपासण्यांचा अहवाल सादर केला. त्यानुसार तिच्या शरीरात बेंझोडायझोपिन या औषधाचं प्रमाण अधिक आढळलं होतं. अॅन्टीडिप्रेशन म्हणून बेंझोडायझोपिन औषधाचं सेवन केलं जातं.

इंद्राणी मुखर्जीला शुक्रवारी रात्री जे.जे. रुग्णालयात प्रकृती अस्वास्थानंतर दाखल करण्यात आलं होतं. पण, आता तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.



हेही वाचा-

इंद्राणीनं घेतला नैराश्य दूर करणाऱ्या औषधांचा ओव्हरडोस

इंद्राणी मुखर्जीची प्रकृती धोक्याबाहेर



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा