'भाबीजी' शिल्पा शिंदेचा निर्मात्यावर छेडछाडीचा आरोप

 Mumbai
'भाबीजी' शिल्पा शिंदेचा निर्मात्यावर छेडछाडीचा आरोप

मुंबई - 'भाबीजी घर पर है' फेम शिल्पा शिंदेने निर्मात्या विरोधात छेडछाडीची तक्रार नायगाव पोलिसात दाखल केली आहे. निर्माता संजय कोहली विरोधात शिल्पानं तक्रार दाखल केली आहे. शुटींगच्या दरम्यान निर्माता संजय कोहली तिची छेडछाड करत असल्याचा तिने आरोप केला आहे. तसेच 'संजय हा आपल्या अंगाला स्पर्श करत असे आणि जेव्हा मी त्याला रोखत असे तेव्हा तो चुकून हात लागल्याचं सांगत असल्याचे शिल्पा शिंदे हिने सांगितले आहे. 

दरम्यान याच्याच रागातून संजय कोहलीनं 3 महिन्यांचा पगार दिला नसून, कुठेही मला काम देऊ नका, यासाठी इतर सिरीअलच्या प्रोड्युसरला सांगून माझी बदनामी केल्याचाही आरोप शिल्पानं केला आहे. तसेच पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी कारवाई करण्यास विलंब केल्याने एफआयआर दाखल होण्यास उशिर झाल्याचे तिने सांगितले आहे.

Loading Comments