शिवसेना नगरसेविकेची भगवती रुग्णालयातील डाॅक्टरांना दमदाटी, व्हिडीओ व्हायरल

या घटनेनंतर हॉस्पिटलमधील सर्व १३ निवासी डॉक्टरांनी राजीनामे दिले. त्यामुळे अखेर संध्या दोषी यांनी माफीनामा सादर केला.

शिवसेना नगरसेविकेची भगवती रुग्णालयातील डाॅक्टरांना दमदाटी, व्हिडीओ व्हायरल
SHARES

कांदिवलीमधील पालिकेच्या भगवती रुग्णालयात एका रुग्णाला भरती करण्यावरून शिवसेनेच्या स्थानिक नगरसेविका आणि शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी डॉक्टरांशी वाद घालत मोठा गोंधळ निर्माण केला .डॉक्टरांशी वाद घालत असताना आणि दमदाटी करत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला . यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी घडलेला प्रकार माध्यमांसमोर सांगितला. 

या घटनेनंतर हॉस्पिटलमधील सर्व १३ निवासी डॉक्टरांनी राजीनामे दिले. त्यामुळे अखेर संध्या दोषी यांनी माफीनामा सादर केला.  तर या प्रकरणी दोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा आणि शिक्षण समिती अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी शिक्षण समितीवरील भाजपा सदस्यांनी पालिका आयुक्तांना पत्र पाठवून केली आहे.

आपल्या एका रुग्णाला योग्य ती वागणूक न दिल्याबद्दल जाब विचारण्यासाठी दोशी भगवती रुग्णालयात गेल्या होत्या. संध्या दोशी यांनी आपल्याच नातेवाईकांवर पहिले उपचार करावे, असा आग्रह धरला आणि त्यानंतर त्यांनी वाद घालण्यास सुरुवात केल्याचे तेथील निवासी डॉक्टरांनी सांगितलं.

डॉक्टरसोबत वादाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ‘अशा दहा हॉस्पिटलमध्ये दहा डॉक्टर उभे करु शकते. माझ्या नातेवाईकांसोबत तुमची भाषा घाणेरडी होती. डॉक्टरांना सौजन्याने बोलायला शिकवा’ असं दोषी बोलताना ऐकू येत होतं.  पालिकेच्या विभाग कार्यालयांतील सहाय्यक आयुक्तांशी संपर्क साधून त्यांना तात्काळ रुग्णालयात यावे असेही दोशी यांनी बजावले. हा गोंधळ बराच वेळ सुरू होता. या प्रकारामुळे रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

संध्या दोषी यांचा माफीनामा

दरम्यान, संध्या दोषी यांनी या प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. माझा उद्देश पेशंटला अॅडमिट करण्याचा होता. त्यातून माझ्याकडून डॉक्टर किंवा स्टाफ यांचे मन दुखावले असेल, तर मी दिलगिरी व्यक्त करते, असा व्हिडीओ संध्या दोषी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.



हेही वाचा 

मास्कविना फिरणाऱ्यांवर रेल्वेची कारवाई

मुंबईतील 'या' रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास




संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा