एकतर्फी प्रेमातून २१ वर्षाच्या तरुणीवर ब्लेडने हल्ला


एकतर्फी प्रेमातून २१ वर्षाच्या तरुणीवर ब्लेडने हल्ला
SHARES

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने २१ वर्षाच्या तरुणीवर दिवसा ढवळ्या ब्लेडने हल्ला केल्याची घटना शिवडीच्या सिद्धांत इमारतीजवळ बुधवारी सकाळी घडली. तरुणीवर जिवघेणा हल्ला केल्यानंतर तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरएके पोलिसांनी पुकार नाटे (२२) याला अटक केली आहे.


संपूर्ण प्रकार

शिवडी परिसरात राहणाऱ्या पीडित तरुणीच्या घराजवळच पूर्वी पुकार रहात होता. मागील सात वर्षांपासून दोघांमध्ये प्रेमसंबध होते. मात्र कालांतराने पुकार हा डोंबिवली येथे रहायला गेला. या दोघांच्या प्रेमसंबधाबद्दल मुलीच्या घरातल्यांना समजल्यानंतर त्यांनी पुकारच्या बोलावून त्याला मुलीपासून लांब राहण्याबाबत समज दिली. त्यानंतर मुलीने पुकारशी बोलणं बंद केलं. आणि पुकारला टाळू लागली. पुकार याच गोष्टीचा राग मनात धरून होता.

बुधवारी सकाळी पीडीत मुलगी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी पुकारने मुलीला परळच्या जी. डी. आंबेकर मार्गवरील सिद्धांत इमारतीजवळ अडवून तिला समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगी ऐकत नसल्याने राग अनावर झालेल्या पुकारने सोबत आणलेल्या ब्लेडने मुलीवर असंख्य वार केले. दिवसा ढवळ्या मुलीवर झालेल्या या हल्ल्यानंतर नागरिक पुकारला पडण्यासाठी जाणार तोच त्याने स्वत:वरही वार करून घेतले. याबाबत स्थानिकांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोनकरून माहिती दिल्यानंतर आरएके पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी पोलिसांनी मुलीसह पुकारला तातडीने उपचारासाठी परळच्या के. ई. एम रुग्णालयात दाखल केले असून दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरएके पोलिसांनी पुकार विरोधात भा. दं. वि. कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६ आणि ३०९ नुसार गुन्हा नोंदवला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा