बिहारचा ‘सिंघम’ मुंबईत

 Pali Hill
बिहारचा ‘सिंघम’ मुंबईत

मुंबई - बिहारचा ‘सिंघम’ म्हणून आेळख असलेले आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांची मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकात पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिवदीप लांडे हे या आधी बिहारमध्ये कार्यरत होते.

बिहारमध्ये त्यांनी आपल्या कर्तव्यदक्षतेची छाप सोडली होती. महाराष्ट्रातही आयपीएस शिवदीप लांडे जीवाचं रान करून कार्य करतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. शिवदीप लांडे हे महाराष्ट्रात तीन वर्षांसाठी कार्यरत असणार आहेत. शिवदीप लांडे यांनी बिहारमधील अतिशय धोकादायक समजल्या जाणाऱ्या भागातही सर्व प्रकारच्या माफियांना सळो की पळो करून सोडले होते.

Loading Comments