मुंबईतील धक्कादायक घटना, कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार

पार्किंग स्लाॅटमध्ये त्या भटक्या कुत्रीवर लैगिक अत्याचार करत होता.

मुंबईतील धक्कादायक घटना, कुत्रीवर अनैसर्गिक अत्याचार
SHARES

मुंबईतील मुलुंड (mulund) परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुलुंड परिसरात असलेल्या एका को. आँ. सोसायटीमध्ये एका कुत्रीवर लैंगिक अत्याचार (Female dog sexual assault) झाल्याची माहिती समोर आली आहे.परिसरातील एका नागरिकांने या विकताचे हे कृत्य पाहिल्यानंतर मुलुंड पोलिसांना पाचरण केले. मुलुंड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून त्या विकृताला अटक केली आहे.

हेही वाचाः- अर्णब गोस्वामी यांना अटकेपासून संरक्षण, न्यायालयाने सचिवांना सुनावलं

मुलुंडच्या एका नामकिंत सोसायटीत आरोपी शोभनाथ सरोज (३०) हा लेबर म्हणून काम करतो.  ५ नोव्हेंबर रोजी आरोपी हा सोसायटीच्या पार्किंगमध्ये काही संशयित हालचाली करत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी सोसायटीतील नागरिकांनी पाहिले असता. शोभनाथ हा पार्किंग स्लाँटमध्ये त्या भटक्या कुत्रीवर लैगिक अत्याचार करत होता. नागरिकांनी त्याला रंगेहाथ पकडल्यानंतर हा सर्व प्रकार पुढे आला. शोभनाथ हा त्याच सोसायटीत रहात असल्याचे सांगण्यात आले आहे.  या प्रकऱणी तक्रारदार अमितकुमार उदयराज सिंग यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मुलुंड पोलिसांनी शोभनाथवर कलम ३७७ भा.द.वीसह प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६०, ११(१),(ए) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी शोभराज याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावलेली आहे.

हेही वाचाः- मेट्रोच्या विषयावर थेट चर्चेला या! आदित्य ठाकरेंना आव्हान

मुंबईत काही दिवसांपूर्वी पवई परिसरात देखील अशीच एक घटना समोर आली होती. पवई (Powai) परिसरात असलेल्या एका शॉपिंग मॉलमध्ये (Shopping Complex) एका कुत्रीवर लैंगिक अत्याचार (Female dog sexual assault) झाल्याची घटना घडली होती. विकृत आरोपीने कुत्रीच्या खासगी भागात लाकडाचा एक तुकडा टाकून तिच्यावर अत्याचार केले होते. त्या कृत्रीची प्रकृती चिंताजनक होती. या प्रकरणी गुन्हा देखील नोंदवण्यात आला होता. मात्र आरोपीचा शोध सुरू होता.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा