अरबी समुद्रातील धक्कादायक प्रकार, छोट्या बोटीला धडक देऊन बुडवण्याचा प्रयत्न


अरबी समुद्रातील धक्कादायक प्रकार, छोट्या बोटीला धडक देऊन बुडवण्याचा प्रयत्न
SHARES

देवनार येथे रिक्षा चालकासोबत घडलेल्या वादातून दुचाकीस्वाराचा अपघात घडून आणून त्याला मारण्याचा प्रकार ताजा असताच आता मुंबईतील खोल भरसमुद्रात झालेल्या वादानंतर बोटीला मोठ्या बोटीच्या सहाय्याने वारंवार धडक देऊन बुडवण्याचा प्रयत्न केल्याचा घडला आहे. याप्रकरणी यलोगेट पोलिसांनी नुकताच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचाः- 'शिवशाही' कॅलेंडरवर उर्दू भाषेतील मजकूर

तक्रारदार विल्सन घटया हे मूळचे वसई येथील पाचू बंदर परिसरातील मच्छीमार आहेत. तक्रारदार विल्सन त्यांचा सहकारी मोजेस संजाळ(४९) याच्यासोबत मासेमारीकरण्यासाठी मुंबईतील खोल समुद्रात गेले होते. त्यावेळी त्यांच्या जागेवर अनोळखी बोटीतील खलाश्यांनी जाळे टाकले होते. ते जाळे काढण्यासाठी सांगण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातून मोठ्या बोटीतील आरोपींपैकी एकाने मोजेसच्या डोक्यात रोखंडी रॉड मारून त्याला रक्तबंबाळ करून टाकले. तेवढ्यावरच ते थांबले नाही, तर त्यांनी त्यांच्या मोठ्या बोटीच्या सहाय्याने विल्सन यांच्या बोटीला वारंवार धडक देऊन बुडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तावडीतून सुटका केल्यानंतर विल्सन यांनी थेट वसई येथील पोलिस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार केली. पण हा गुन्हा यलोगेट पोलिसांच्या हद्दील घडल्यामुळे तेथून हा गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.याप्रकरणी यलोगेट पोलिसांनी भांदवि कलम ३०७, ३२४, ३४१,१४३, १४४, १४७, १४८, १४९, १५०, ५०४, ४२७ अंतर्गत आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आरोपी बोटीत आठ जण असल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे. त्यातून याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी बोटीचा क्रमांक पोलिसांना प्राप्त झाला असून त्याच्या सहाय्याने अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसाने सांगितले.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा