Shraddha Murder Case: आफताबच्या फ्लॅटमध्ये फॉरेन्सिक टीमला काय सापडलं?

फॉरेन्सिक पथकाचे प्रमुख संजीव गुप्ता यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना आफताबच्या फ्लॅटमध्ये नेमकं काय सापडलं याचा खुलासा केला आहे.

Shraddha Murder Case: आफताबच्या फ्लॅटमध्ये फॉरेन्सिक टीमला काय सापडलं?
SHARES

फॉरेन्सिक पथकाने आफताब पूनावाला याला त्याच्या फ्लॅटवर नेलं, जिथे त्याने आपली प्रेयसी श्रद्धा वालकरचा गळा दाबून खून केल्यानंतर मृतदेहाचे ३५ तुकडे केले.

फॉरेन्सिक पथकाचे प्रमुख संजीव गुप्ता यांनी ‘इंडिया टुडे’शी बोलताना आफताबच्या फ्लॅटमध्ये नेमकं काय सापडलं याचा खुलासा केला आहे. किचनमध्ये रक्ताचे डाग आढळले असून, नाल्यात काही हाडं सापडली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, फॉरेन्सिकला फक्त किचनमध्येच रक्ताचे डाग आढळले आहेत. कारण आफताबने केमिकलच्या सहाय्याने सर्व घर स्वच्छ करत डाग मिटवून टाकले होते. आफताबने पोलिसांना मृतदेहाचा एक तुकडा किचनमध्ये ठेवल्याचं सांगितलं होतं. तिथेच फॉरेन्सिकला रक्ताचे डाग आढळले आहेत.

फॉरेन्सिकच्या माहितीनुसार, आफताब जिथे केमिकलचा वापर करू शकला नाही, फक्त त्या एकाच जागी रक्ताचे डाग आढळले आहेत. तपासात आफताबने रक्ताचे डाग मिटवण्यसाठी हायपोक्लोरिक अॅसिडचा वापर केल्याचं समोर आलं होतं.

आफताबने बाथरुमच्या आतमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. आफताबने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, रक्त वाहून जावं यासाठी त्याने मृतदेहाचे तुकडे करताना नळ सुरू ठेवला होता. फॉरेन्सिक पथकाला, बाथरुममध्ये कोणताही पुरावा सापडलेला नाही. तसंच ज्या बेडरुममध्ये त्याने गळा दाबून श्रद्धाचा खून केला तिथेही काही सापडलेलं नाही.

ज्या फ्रीजमध्ये त्याने १७ ते १८ प्लास्टिक पिशव्यांमध्ये मृतदेहाचे तुकडे ठेवले होते तिथेदेखील काही आढळलेलं नाही. ज्या फ्रीजमध्ये मृतदेहाचे तुकडे होते, तिथे काही खाण्याच्या गोष्टी सापडल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

फॉरेन्सिकला नाल्यात काही हाडं सापडली असून ही श्रद्धाची असावीत असा त्यांचा अंदाज आहे. आफतबाने मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची ठिकाणं सांगितल्यानंतर ही हाडं सापडली आहेत. जर श्रद्धाचा डीएनए या हाडांशी जुळला तर पोलिसांकडे मोठा पुरावा असेल.

वसईतील २६ वर्षीय श्रद्धा वालकर या तरुणीची तिच्याच प्रियकराने दिल्लीत खून करुन मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना समोर आल्यानंतर खळबळ माजली आहे.

आरोपी प्रियकर आफताब पूनावाला याने मृतदेहाचे तुकडे तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले. त्यानंतर ते जंगल भागात विविध ठिकाणी फेकून दिले. सहा महिन्यानंतर हे क्रौर्य उघडकीस आलं आहे.

श्रद्धाने प्रियकर आफताब अमीन पूनावाला याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्याने त्याने तिची खून केल्याचं तपासात उघड झालं आहे. कुटुंबीयांनी आंतरधर्मीय विवाहास नकार दिल्याने दोघेही घर सोडून दिल्लीत वास्तव्यास आले होते. पोलिसांनी आरोपी पूनावाला याला अटक केली आहे.हेही वाचा

आफताबने 2020 मध्येही श्रद्धाला केलेली मारहाण, फोटो व्हायरल

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा