आफताबने 2020 मध्येही श्रद्धाला केलेली मारहाण, फोटो व्हायरल

श्रद्धा खून प्रकरणात नवीन माहिती समोर आले आहेत,

आफताबने 2020 मध्येही श्रद्धाला केलेली मारहाण, फोटो व्हायरल
SHARES

श्रद्धा (Shraddha Walkar murder case) खून प्रकरणात नवीन माहिती समोर आले आहेत, तिच्या मित्रांच्या म्हणण्यानुसार, 2020 मध्ये श्रद्धावर तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबने हल्ला केला होता आणि त्यानंतर तिने तीन दिवस हॉस्पिटलमध्ये घालवले होते. त्यावेळचा एक फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये श्रद्धाच्या गालावर आणि नाकावर जखमा दिसत आहेत.


इंडिया टुडे मधील एका वृत्तानुसार, पीडितेला 2020 मध्ये वसईत एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पाठिला दुखापत झाल्याने ती उपचार घेत होती. तिच्या चेहऱ्यावर आणि पाठिवर मारहाणीमुळे दुखापत झाल्याचे बोलले जात आहे.

नालासोपारा येथील ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ एसपी शिंदे यांनी एएनआयला सांगितले की, "श्रद्धाला खांदे आणि पाठीत तीव्र वेदना होत असल्याने तिला दाखल करण्यात आले होते, तिने कारण सांगितले नाही. तिच्या अंगावर फार मोठी जखम आढळून आली नाही. अॅडमिशनच्या वेळी आफताब उपस्थित होता."

अहवालानुसार, 3 डिसेंबर 2020 रोजी, श्रद्धाला पाठीच्या आणि मणक्याच्या तीव्र त्रासामुळे वसईतील ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते जे सुमारे आठवडाभर सुरू होते. पाठीच्या दुखण्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, जे आफताबने तिच्यावर हल्ला केल्यामुळे झाल्याचे समजते.

आफताब अमीन पूनावाला याने तपासकर्त्यांना कबूल केले आहे की, त्याच्या लिव्ह-इन पार्टनरच्या शरीराचे 35 वेगवेगळे तुकडे करण्यास त्याला 10 तास लागले. शिवाय ओळखता येऊ नये इथपर्यंत तिचा चेहरा जाळला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

अद्याप तपास सुरू असल्याने, मेहरौली जंगलात 27 वर्षीय पीडित श्रद्धा वालकरचे आणखी अवशेष मिळवण्यासाठी पोलिस पथकांनी भेट दिली आणि शोध घेतला.

याशिवाय दिल्ली पोलिसांची एक टिम मुंबईत तपासासाठी दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आफताबच्या कुटुंबाचा कुठलाच थांगपत्ता लागत नाही आहे. त्यामुळे त्याचे कुटुंब अचानक गायब कुठे झाले? त्यांना याबद्दल काही माहिती आहे की नाही? याचाही तपास पोलिस करत आहेत.हेही वाचा

मुंबईतील फूड ब्लॉगर आफताब पूनावाला बद्दल जाणून घ्या 10 गोष्टी ज्याने गलफ्रेंडचे केले तुकडे

'डेक्स्टर' क्राईम शोमधून प्रेरित होऊन आफताबने केली हत्या, शरीराचे तुकडे...

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा