विनयभंगाच्या गुन्ह्यातून गायक अभिजीत भट्टाचार्य निर्दोष


विनयभंगाच्या गुन्ह्यातून गायक अभिजीत भट्टाचार्य निर्दोष
SHARES

विनयभंगाच्या गुन्ह्यात अडकलेला प्रसिद्ध गायक अभिषेक भट्टाचार्यविरोधात कोणताही पुरावा न आढळल्यामुळे पोलिसांनी त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. मागील वर्षी भट्टाचार्यविरोधात विनयभंगाचा गुन्हा अंबोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.


 विनयभंगाचा गुन्हा

अंधेरीतल्या प्रसिद्ध हाॅटेल टिक्कामध्ये ७ ऑगस्ट २०१८ रोजी पीडित महिला तिच्या वडिलांसोबत जेवायला गेली होती. तसंच हे हॉटेल अभिजीत भट्टाचार्य यांचं असल्याचं समोर आलं. यावेली काही कारणावरून या महिलेचं हॉटेलचा मॅनेजर जस्कीत सिंग धामसोबत वाद झाले. यावेळी जस्कितनं शिवीगाळ केल्याचा आरोप महिलेनं केला. तसंच अभिजीतनं देखील फोन करून शिवीगाळ आणि अश्लील भाषेत गैरवर्तन केल्याचा आरोप या महिलेनं केला. त्यानुसार अंबोली पोलिस ठाण्यात धाम आणि अभिजीत विरोधात धमकावणं आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र तपासादरम्यान पोलिसांना या गुन्ह्यात अभिजीत विरोधात कोणताही पुरावा सापडला नाही. त्यानुसार पोलिसांनी नुकतेच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.


पुरावा नाही

या प्रकरणात अभिजीतची निर्दोष मुक्तता करत, पोलिसांनी धाम विरोधात गुन्हा कायम ठेवला आहे. या गुन्ह्यात धामला पोलिसांनी या पूर्वीच अटक केली होती. पोलिसांनी त्याला जामीनावर सोडलं होतं. अांबोली पोलिसांनी नुकतीच या प्रकरणी अंधेरी न्यायालयात धामविरोधात आरोपपत्र दाखल केले असून या आरोपपत्रात अभिजीत विरोधात कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे नमुद करण्यात आलं आहे. याशिवाय अभिजीतच्या मोबाइलवरून कोणताही दूरध्वनी महिलेच्या वडिलांच्या मोबाइलवर गेला नसल्याचंही यात नमुद करण्यात आलं आहे.



हेही वाचा

कोरिओग्राफर सलमान खानविरोधात गैरवर्तनाचा गुन्हा

पोलिस आयुक्तांनी घेतली शिपायाच्या कामगिरीची दखल




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा