पोलिस आयुक्तांनी घेतली शिपायाच्या कामगिरीची दखल


पोलिस आयुक्तांनी घेतली शिपायाच्या कामगिरीची दखल
SHARES

एका शिपायाने मोठ्या शिताफीने सराईत आरोपीला पकडल्याची माहिती मिळताच, पोलिस आयुक्तांनी पोलिस ठाण्याला अनपेक्षित भेट शिपायाचे कौतुक केले. आयुक्तांनी पोलिस शिपायाच्या या कामगिरीची दखल घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.


दुचाकीस्वारांचा पाठलाग

वडाळा टी.टी. पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस शिपाई बिळासकर हे १ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या वेळी गस्तीवर असताना दोन दुचाकीस्वारांनी एका ठिकाणी चोरी करून पळ काढला. त्यावेळी बिळासकर यांनी त्या दुचाकीस्वारांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. बिळासकर आणि चोरट्यांमध्ये झालेल्या झटापटीत एक आरोपी पळून गेला. मात्र, दुसऱ्या आरोपीला बिळासकर यांनी पकडून ठेवले. पोलिसांची वाढीव कुमक त्यावेळी त्यांच्या मदतीसाठी आली. बिळासकर यांच्या या कामगिरीची माहिती पोलिस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांच्या कानावर अाली. आयुक्तांनी सहपोलिस आयुक्त देवेन भारती यांच्यासह शुक्रवारी वडाळा टी.टी. पोलिस ठाण्याला अनपेक्षित भेट देऊन बिळासकर यांच्या कामगिरीचे कौतुक केले.



हेही वाचा -

जीएसबी मंडळ उभारणार सुसज्ज रुग्णालय

कोरिओग्राफर सलमान खानविरोधात गैरवर्तनाचा गुन्हा



संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा