लुटारूंचा पर्दाफाश


लुटारूंचा पर्दाफाश
SHARES

मुंबई - बंदुकीचा धाक दाखवत सीएच्या कार्यालयातून ७५ लाख रुपयांची लूट करणाऱ्या राजस्थानमधील मुख्यसूत्रधारासह सहा आरोपींना पोलिसांच्या विशेष पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. अटकेतील आरोपींजवळून साडेअकरा लाखांचा एवज जप्त करण्यात आला असून अन्य पाच आरोपींचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे.
धोबी तलाव परिसरातील डॉ. कावासजी स्ट्रिटवर असलेल्या महेश थानवी (४७) यांच्या कार्यालयात ४ ऑक्टोबरला संध्याकाळी घुसलेल्या शस्त्रधारी लुटारूंनी बंदुकीच्या धाकावर ७५ लाखांच रोख रक्कम आणी चार मोबाईल चोरी करून पळ काढला होता.
थानवी यांच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात रोकड येत असल्याचे फक्त येथील कर्मचाऱ्यांना माहीत होतं. त्यानुसार पोलिसांनी या कर्मचाऱ्यांची कसून चैकशी सुरू केली. मात्र काहीच धागेदोरे हाती लागलं नाही. अखेर सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल कवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कदम, पोलीस निरीक्षक बोराटे, भायखळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि पायधुनी, कफपरेड, एमआरए मार्ग, मरीन ड्राईव्ह आणि जे. जे. मार्ग पोलीस ठाण्याची पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला.
थानवी यांच्या कमर्चाऱ्यांकडे चैकशी सुरू असताना एका कर्मचाऱ्याने पैशांबाबत दीड महिन्यांपूर्वी झेराक्स दुकानवाल्याकडे चर्चा केली होती. झेरॅक्सवाल्याने ही गोष्ट त्याचा राजस्थानी मित्र श्रवणकुमार पुरोहीत (२३) याला सांगितली, याच पुरोहीतनं सीएच्या कार्यालयाची रेकीकरून कट रचल्याची माहिती पोलिसांना समजली.
त्यानुसार पोलिसांनी राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात आणि पुणे येथे छापे टाकून पुरोहीत याच्यासह श्रवण रावल (२४), किशोर गेहलोत (२०), दिपाराव माळी (२३) मोडकसिंग राजपूत (२१) कैलाश वैष्णव (२१) या सहा आरोपींना बेड्या ठोकल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा