कॉक्स अँड किंग्स विरोधात सहावा गुन्हा दाखल

बँकेच्या तक्रारीवरून कंपनीचे प्रमोटर अजय अजीत पीटर केरकर, पत्नी उर्शिला केरकर व इतर संचालक, ऑडिटर्स व इतर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉक्स अँड किंग्स विरोधात सहावा गुन्हा दाखल
SHARES

लक्ष्मी विलास बँकेची ३५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने कॉक्स अँड किंग्सचे प्रमोटर, संचालक व इतर कर्मचा-यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कॉक्स अँड किंग्स विरोधात दाखल करण्यात आलेला सहावा गुन्हा आहे.

हेही वाचाः- महापालिकेची विशेष पथकं ठेवणार नाईट क्लबवर नजर

बँकेच्या तक्रारीवरून कंपनीचे प्रमोटर अजय अजीत पीटर केरकर, पत्नी उर्शिला केरकर व इतर संचालक, ऑडिटर्स व इतर यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्राथमिक तपासणीत याप्रकरणी गुन्हा दाखल होत असल्याचे निष्पन्न  झाल्यानंतर शुक्रवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. आर्थिक गुन्हे शाखेच्या बँकिंग फसवणूक-२ कक्ष याप्रकरणी तपास करत आहे. याप्रकरणी भादंवि कलम ४०६,४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१व १२०(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी एचडीएफसी बँक, अॅक्सीस बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक व खासगी गुंतवणूकदार कंपनी यांनी तक्रार केली आहे. त्या पाच तक्रारीनुसार १९५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे. कॉक्स अँड किंग्सचे पीटर केरकर यांच्याही तक्रारीवरून याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचीही तपासणी आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. याप्रकरणी नुकतीच कंपनीचे सीएफओ अनिल खंडेलवाल यांचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेने घेतला आहे. याप्रकरणी इतर आरोपींचा ताबाही आर्थिक गुन्हे शाखा घेणार आहे. याप्रकरणी ईडीनेही मनी लॉंडरींगप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत तिघांना अटक केली आहे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा