कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे विक्री आणि प्रदर्शन

नरीमन पॉईंट - मंत्रालयाच्या आवारात कैद्यांनी तयार केलेल्या वस्तूंचं विक्री आणि प्रदर्शन भरवण्यात आलंय. या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आलं. या वेळी गृहमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. तुरुंग प्रशासनातील सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कैद्यांचं पुनर्वसन आणि त्यांच्यातील कलेला वाव देऊन स्वावंलबी जीवन जगता यावं, हा या मागचा उद्देश आहे. या प्रदर्शनात ठाणे, पुणे येरवडा, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक या ठिकाणांच्या मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांनी तयार केलेल्या वस्तू आहेत. प्रदर्शनात बेकरी पदार्थ, एलईडी बल्ब, चादरी, सतरंज्या, हातमागावरील वस्त्रे, कपडे, लाकडी सुतारकाम केलेल्या कलात्मक वस्तू, चर्मोद्योगातील वस्तू ठेवल्या आहेत. मंत्रालयातील महिला कर्मचाऱ्यांनी या वस्तू खरेदीला चांगला प्रतिसाद दिलाय.

Loading Comments