शाळेचं छत पडून चिमुरडीचा मृत्यू

 Antop Hill
शाळेचं छत पडून चिमुरडीचा मृत्यू
शाळेचं छत पडून चिमुरडीचा मृत्यू
See all

शीव-कोळीवाडा - सनातन धर्म हायस्कूल आणि जुनिअर कॉलेज प्रवेशद्वाराच्या छताचे स्लॅब कोसळून बुधवारी 5 वर्षांच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. मुस्कान खान असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. सरोजा देवी (5), आयुष (5) आणि रईसा खातून(29) अशी जखमी झालेल्यांची नावं आहेत. जखमींना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

 

 

 

 

शाळेचा हॉल लग्न समारंभासाठी भाड्याने दिल्याने बुधवारी शाळा लवकर सोडण्यात आली. त्यामुळे शाळेतील मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी पालक शाळेच्या आवारात उपस्थित असताना अचानक शाळेच्या प्रवेशद्वाराच्या छताचा स्लॅब कोसळला. मुस्कानला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं मुस्कानचे वडील ईबले हुसेन खान यांनी सांगितलं. या घटनेत मुस्कानची आई रईसा यांना देखील गंभीर जखम झाली आहे.

 

 

 

 

तर, या सर्व घटनेला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पालकांनी केलाय. तर, निखळून पडणाऱ्या स्लॅबबाबत सहा महिन्यांपूर्वी पालक सभेत तक्रार केली होती. तरी शाळा प्रशासनाने याची डागडुजी केली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. याबाबत अॅन्टॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading Comments