आईच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून मुलाने केली आईची हत्या

मुलाने अनेकदा आईला दारू सोडण्यासाठी सांगितलं. पण आई व्यसनाच्या पुर्ण आहेरी गेली होती. घरात सतत या गोष्टीवरून वाद होत होते.

आईच्या दारुच्या व्यसनाला कंटाळून मुलाने केली आईची हत्या
SHARES

अठरा वर्षे वयाच्या मुलाने आपल्या आईचीच हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. वसई पश्चिमेच्या कोळीवाडा येथे मंगळवारी रात्री ही घटना घडली. वसई पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

धक्कादायक म्हणजे आईला दारूचे व्यसन होते आणि ती सतत दारूच्या नशेत असायची. म्हणून तरुणानं आईला संपवण्याचा निर्णय घेतला. वसई पश्चिममधील कोळीवाडा येथील आयुष अपार्टमेंटमधील मेरी यादव (५९) ही महिला मुलगा सनी  व मुलगी पूजासोबत राहत होती. मेरीच्या पतीचं दोन वर्षांपूर्वी निधन झालं आहे. 

मुलाने अनेकदा आईला दारू सोडण्यासाठी सांगितलं. पण आई व्यसनाच्या पुर्ण आहेरी गेली होती. घरात सतत या गोष्टीवरून वाद होत होते. पण आईने दारू न सोडल्यामुळे मुलाने तिची हत्या केली. सनीने रात्री पावणे दहाच्या सुमारास चामड्याच्या पट्ट्याने आईचा गळा आवळून खून केला. 

घटनेची माहिती मिळताच वसई पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तपास केला. आईचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे, तर आरोपी मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

सनीचे बारावीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. आईला असलेले मद्याचे व्यसन आणि त्यामुळे घरात सतत होणारी भांडणं यामुळे सनीने ही हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा