क्षुल्लक वादातून मुलानेच केली बापाची हत्या


क्षुल्लक वादातून मुलानेच केली बापाची हत्या
SHARES

मुंबईच्या ओशिवरा परिसरात क्षुल्लक कारणांवरून एका मुलाने आपल्या वडिलांचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमर आली आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी या तरूणाला अटक करुन तुरूंगात पाठविले आहे.

जोगेश्वरी परिसरात गुलाबचंद यादव हे आपल्या दोन मुलांसह राहतात. यादव हे  एक मानसिक रुग्ण असून मागील ८ वर्षांपासून वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असून ऑक्टोबर २०१८ पासून मुंबईच्या कूपर रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचारा दरम्यान डॉक्टरांना असे आढळले की  यादव यांना ‘पॅरानोइड स्किझोफ्रेनिया’ नावाचा आजार आहे.  वडिलांच्या आजारपणामुळे दोन्ही मुल मानसिक तणावाखाली होती. दरम्यान आरोपीचा मोठा भाऊ शनिवारी नेहमीप्रमाणे कामावर गेला असताना. संध्याकाळी आरोपी हा कुणालाही न सांगता घराबाहेर गेला आणि काही तासांनी तो परत आला. त्यावेळी वडिलांसोबत त्याचे भांडण झाले. त्यावेळी राग अनावर झालेल्या मुलाने जवळच पडलेल्या स्टंपने वडिलांच्या डोक्यात मारला.

हा प्रकार इतका घातक होता की, गुलाबचंद यादव जागीच कोसळले. या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी मोठ्या मुलाला दिल्यानंतर तो तातडीने घटनास्थळी पोहचला. त्याने वडिलांना उपचासाठी तातडीने जवळील रुग्णालयात नेले. मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्याने त्यांनी यादव यांना कूपर रुग्णालयात हलवले. मात्र उपचारा दरम्यान यादव यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी लहान मुलावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा