सोनम गुप्ता कॉलिंग

मुंबई - सोनम गुप्ता बेवफा है, हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर सगळीकडे गाजतंय. सोनम गुप्ता प्रकरण नेमकं आहे तरी काय? कोण आहे ही सोनम गुप्ता, जी अशा पद्धतीनं सोशल मीडियावर बदनाम होतेय? नोट असो किंवा डॉलर सगळ्या नोटांवर सोनम गुप्ताचंच नाव आणि त्याचीच चर्चा... ज्या सोनम गुप्ताची बदनामी होतेय ती कोण आहे याचं उत्तर कदाचित कुणाकडे नसेल. सोशल मीडियावर धुमाकूळ माजवलेल्या या प्रकरणानं देशभरातल्या सोनम गुप्ता नावाच्या मुली हैराण झाल्या असतील. त्याचसाठी मुंबई लाइव्हनं तुम्हाला या खास व्हिडिओमध्ये सोनम गुप्ताचं दु:ख दाखवलंय. मुंबई लाइव्ह तुम्हाला आवाहन करतंय की, अशा प्रवृत्तीनां बळ नका देऊ. हे केल्यामुळे तुम्ही एखाद्याला दुखवू शकता आणि तुम्ही अपराधीही होऊ शकता. यासाठी तुम्हाला जेलमध्ये जावं लागू शकतं. दरम्यान वकील समीर सुर्वे यांनी स्पष्ट केलंय की, अशा प्रकारच्या घटनांमध्ये आयटी कायद्यांन्वये कारवाई होऊ शकते. तसंच आरोप सिद्ध झाल्यास एक ते 3 वर्षांची शिक्षा आणि दंडही होऊ शकतो.

Loading Comments