अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

 Mumbai
अबू आझमी यांना जीवे मारण्याची धमकी

समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांना शनिवारी अज्ञात इसमाने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात अबू आझमी यांचे स्वीय सहाय्यक कमाल हुसैन यांनी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

अबू आझमी यांना अज्ञात इसमाचा फोन आला होता. त्यांचे स्वीय सहाय्यक कमाल हुसैन यांनी हा फोन उचलला, धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीने आझमी किधर है, उसको बोलना ठोक दूंगा अशी धमकी दिली. अबू आझमी यांच्या स्वीय सहाय्यकाने संबधित व्यक्तीला कारण आणि नाव विचारले असता "उसको बोलना सिर्फ ठोक दूंगा उसको पता चल जाएगा की कौन है", अशी धमकी दिली. सध्या अबू आझमी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत.

यासंदर्भात अबू आझमी यांचे स्वीय सहाय्यक कमाल हुसैन यांनी कुलाबा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला असता हा अज्ञात व्यक्तीचा फोन लातूर जिल्ह्यातून आल्याचं उघड झाले आहे.

या आधी राज्यातील काही महिला आमदारांना अश्लील फोन करून धमक्यांचे फोन येत होते. त्यावेळी संबधित आरोपीला पोलिसांनी अटकही केली होती.

Loading Comments