अपघातात रिक्षाचालक ठार


अपघातात रिक्षाचालक ठार
SHARES

कन्नमवारनगर - भरधाव कारने दिलेल्या धडकेत ३२ वर्षीय रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी सकाळी पूर्व द्रुतगती मार्गावर घडला. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी कारचालक वसंत लगट याला अटक केली आहे.
वांद्रे परिसरात राहणारे कुर्शिद उर्दू आलम हे शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास रिक्षा पासिंगसाठी विक्रोळीतील गोदरेज कंपनीजवळ थांबले होते. यावेळी भरधाव वेगाने आलेल्या वॅगन आर कारने आलम यांच्या रिक्षाला जोराची धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. अपघातानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या चालक लगट याला रिक्षाचालकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी आलम यांना उपचारांसाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र डाॅक्टरांनी तपासणी केल्यानंतर आलम यांना मृत घोषित केले. 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा