विकीडोनर प्रेमी-युगलांना बेड्या

 Mumbai
विकीडोनर प्रेमी-युगलांना बेड्या

भांडुप - ‘पुरूषांनो... विर्य विका आणि लाखो रुपये कमवा’, असं प्रलोभन दाखवत मुंबईकरांना लाखो रुपयांना गंडा घालून तब्बल दोन महिने पोलिसांच्या हातावर तुरी देत पसार झालेल्या विकी डोनर प्रेमी-युगूलाला अखेर भांडुप पोलिसांनी वसईतून बेड्या ठोकल्यात. अभिनेता अंशुमन खुराना याच्या २०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या विकी डोनर चित्रपटाने प्रभावित होऊन गुन्हा करणाऱ्या या प्रेमी-युगूलाविरोधात एकट्या भांडुप पोलीस ठाण्यात तब्बल २६ तक्रारी दाखल आहेत. मूळचा केरळमधील रहिवाशी असलेला तरबेज खान उर्फ सलिम याने भांडुपकर रेणूका जाधवशी प्रेमविवाह केला होता. उदरनिर्वाहाचे साधन नसल्याने त्यानं विकी डोनर चित्रपटात दाखविल्याप्रमाणे पुरूषांना त्यांच्याकडून विर्य विकत घेण्याचे प्रलोभन दाखवून फसविण्याचा प्लॅन दोघांनी आखला. केरळच्या कोचीन परिसरात असलेल्या लॅबमध्ये हे विर्य संशोधनासाठी पाठविल्यानंतर महिन्याला ४ लाख ७० हजार रुपये मिळतील असे आमिष अनेक तरूणांना दाखवत लाखो रुपये उकळले होते.

Loading Comments