स्टार प्लसवरील 'इश्कबाज'च्या सुपरवायझिंग प्रोड्युसरची आत्महत्या


स्टार प्लसवरील 'इश्कबाज'च्या सुपरवायझिंग प्रोड्युसरची आत्महत्या
SHARES

स्टार प्लस या हिंदी एंटरटेन्मेंट चॅनेलवरील 'इश्कबाज' मालिकेच्या सुपरवायजिंग प्रोड्युसरने आत्महत्या केल्यामुळे हिंदी एंटरटेन्मेंट विश्वाला धक्का बसला आहे. गेल्या शुक्रवारी मालाड वेस्ट परिसरातील एका १६ मजल्यांच्या इमारतीवरून उडी मारून संजय बैरागी या 'इश्कबाज'च्या सुपरवायजिंग प्रोड्युसरने आत्महत्या केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैरागी हे गेल्या काही दिवसांपासून नैराश्याग्रस्त होते. आत्महत्या करताना त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे.

स्पॉटबॉय डॉट कॉम या वेबसाईटशी बोलताना 'इश्कबाज'च्या निर्मात्या गुल खान यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकला. "संजय आर्थिक चणचणीमुळे टेन्शनमध्ये होता. तो खूुप चांगलं काम करत होता. संपूर्ण प्रोडक्शनची जबाबदारी त्याच्यावर होती. मात्र, त्याच्या मृत्यूचं कारण मला सांगता येणार नाही. कारण तो थेट मला रिपोर्ट करत नव्हता. संपूर्ण टीम अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही", अशी माहिती गुल खान यांनी दिली आहे.

'इश्कबाज' ही तीन भावांची कथा आहे. यामध्ये नकूल मेहता, सुरभी चंदना, कुणाल जयसिंह, श्रेणू पारेख, मानसी श्रीवास्तव आणि लिनेश मट्टू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा