महिला अत्याचारांच्या खटल्यासाठी ४८ विशेष न्यायालय स्थापन करणार - अनिल देशमुख

महिलांवरील होणारे अत्याचार आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी देशमुखांनी दिशा कायदा आणण्याची मागणी उचलून धरली

महिला अत्याचारांच्या खटल्यासाठी ४८ विशेष न्यायालय स्थापन करणार - अनिल देशमुख
SHARES

महिला अत्याचार नियंत्रणासाठी राज्य सरकार संवेदनशील असून महिलांवरील अत्याचाराच्या खटल्यांत जलद न्याय मिळावा. यासाठी आंध्रप्रदेश सरकारमध्ये लागू करण्यात आलेला  दिशा सारखा कायदा याच अधिवेशनात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. तसेच राज्यात ४८ विशेष न्यायालये स्थापन करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी मुख्य न्यायमूर्तीशी चर्चा करणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. महिला अत्याचाराबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या चर्चेला विधानसभेत उत्तर दिले.

 हेही वाचाः- पुरुषाच्या 'स्पर्शा'मागचा हेतू स्त्रियांना कळतो : कोर्ट

अहमदनगरमधील घटनेत महिनाभरात चौकशी अहवाल मागवला आहे, तर मीरा-भाईंदरचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावरील महिला अत्याचाराच्या चौकशीचे काम गुन्हे शाखेच्या उपायुक्तांकडे सोपवण्यात आल्याची माहितीही देशमुख यांनी दिली. महिलांवरील होणारे अत्याचार आणि त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी देशमुखांनी दिशा कायदा आणण्याची मागणी उचलून धरली. हा कायदा समजून घेण्यासाठी देशमुख यांनी आंध्रप्रदेशचा दौरा करून तेथील प्रशासकिय अधिकारी आणि मंत्र्यांसोबत बैठक ही केली होती. 

 हेही वाचाः- मुंबई विमानतळावर आतापर्यंत ५५१ विमानांमधून ६५,६२१ प्रवाशांची तपासणी

 त्याच बरोबर शहरातील वाढते अंमली पदार्थाचे प्रमाण आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. त्याच बरोबर सध्या मुंबईत असलेल्या ६ हजार कॅमेऱ्यां ऐवजी मुंबईत नवीन ५ हजार कॅमेरे लावणार असल्याची माहिती देशमुख यांनी विधीमंडळात दिली. पुण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्याही वाढवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचाः - अंमली पदार्थ सेवनाविरोधात स्वयंसेवी संस्थांची मदत घेणार - अनिल देशमुख


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा