चीनमध्ये (China) उद्भवलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) गेल्या काही आठवड्यांमध्ये भीषण रूप धारण केले आहे. आता तर जगातील अनेक देशांमध्ये हा विषाणू पसरला आहे व बघता बघता भारतामध्येही त्याने शिरकाव केला आहे. भारतामध्ये कोरोना व्हायरस संदर्भात आज नवीन दोन प्रकरणांची पुष्टी करण्यात आली. त्यामुळे भारतातील विमानतळावर याबाबत कडक तपासणी सुरू आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून ५५१ विमानांमधून आलेल्या ६५,६२१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली आहे. दुसरीकडे कोरोना व्हायरसमुळे भारताने, इराण, इटली, जपान आणि दक्षिण कोरिया येथील प्रवाशांचा व्हिसा निलंबित केला आहे.
हेही वाचाः- कोरोनाची दहशत महाराष्ट्रातही, अमेरिकी कंपनीने केला दावादिल्ली मुंबईसह देशातील जवळजवळ सर्वच विमानतळांवर रोज हजारो लोकांची तपासणी होत आहे. राज्यात कोरोना व्हायरस प्रभावित भागातून ४०१ प्रवासी येत आहेत. कोरोना व्हायरसची लक्षणे दिसून आलेल्या १५२ प्रवाशांना सर्वांपासून दूर, एकटे निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांच्या अहवालानुसार यापैकी, १४९ जणांची तपासण नकारात्मक आली. ३ लोकांच्या अहवालाची अजून प्रतीक्षा आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर चीन, हाँगकाँग, थायलंड, सिंगापूर, द. कोरिया, जपान, नेपाळ, इंडोनेशिया, व्हिएतनाम आणि मलेशिया येथून ६५,६२१ प्रवासी दाखल झाले. त्यापैकी २९७ प्रवासी महाराष्ट्र राज्यात आले आहेत. त्यांच्या तपासणीसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महापालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
हेही वाचाः- पुरुषाच्या 'स्पर्शा'मागचा हेतू स्त्रियांना कळतो : कोर्ट
बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांमध्ये ८७ जणांना भरती करण्यात आले आहे. त्यांपैकी ८६ जणांचे वैद्यकीय नमुने तपासले असता त्यांना कोरोनाचा संसर्ग नसल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्या सर्वांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या ३ संशयित रुग्ण पुण्यातील नायडू रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात दाखल आहे.