Advertisement

कोरोनाची दहशत महाराष्ट्रातही, अमेरिकी कंपनीने केला दावा

संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत

कोरोनाची दहशत महाराष्ट्रातही, अमेरिकी कंपनीने केला दावा
SHARES

कोरोना या व्हायरसची दहशत महाराष्ट्रातही पसरली आहे. कारण आता नाशिकमध्ये कोरोना व्हायरसचा संशयित रुग्ण आढळला आहे. याआधी दिल्ली, तेलंगणमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते. नाशिकमधील रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

हेही वाचाः- ​Exclusive बर्वेंच्या कारवाईवर परमबीर सिंहांची स्थगिती, ‘या’ अधिकाऱ्यांचं केलं भलं​​​

चीनहून भारतात परतलेले तीन रुग्ण केरळमध्ये होते ते बरे झाल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे देशाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला होता. अशात आता दिल्ली आणि हैदराबाद या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळल्याची बातमी सोमवारीच आली होती. देशात कोरोनाचे एकूण सात संशयित रुग्ण आहेत. आता नाशिकच्या रुग्णाचे रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आले तर त्यालाही कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट होईल. सध्या नाशिकच्या या रुग्णावर उपचार सुरु करण्यात आले आहेत.

हेही वाचाः-​ मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार आरामदायी​​​

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसमुळे घाबरुन जाऊ नये असे आवाहन केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव भारतात पसरू नये यासाठी सरकार आवश्यक ते प्रयत्न करत आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. सर्दी, ताप, खोकला, श्‍वास घेताना त्रास, डोकेदुखी ही कोरोनाची लक्षणे आहेत. त्यामुळे दीर्घकाळ ही लक्षणे दिसल्यास डॉक्टरकडे जाण्यास दिरंगाई करू नका. शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा, पाळीव प्राण्यांपासून दूर रहा असे आवाहन वैद्यकीय अधिकार्‍यांनी केले आहे.

अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांना आशेचा किरण सापडला

एकीकडे कोरोना व्हायरस जगभरात पसरत आहे, तर दुसरीकडे त्याच्यावर उपचारासाठी सर्व शास्त्रज्ञ दिवसरात्र मेहनत करत आहेत. कोरोना व्हायरसला मारक अशा औषधांचा शोध सुरू आहे. त्यात अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांना आशेचा किरण सापडला आहे. आम्ही असा घटक तयार केला आहे, ज्यामुळे कोरोना व्हायरसवर उपचार शक्य आहे, असा दावा अमेरिकेतील फाइजर या औषध कंपनी केला आहे. कंपनीने सांगितले की, या कंपाउंडमध्ये कोरोना व्हायरसला रोखण्याची क्षमता आहे. या कंपाउंडची सध्या स्क्रिनिंग सुरू आहे, जी मार्चपयर्ंत पूर्ण होईल. जर ही स्क्रिनिंग सुरू झाली तर यावर प्रयोग सुरू होईल आणि औषधाची चाचणी होईल.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा