Exclusive बर्वेंच्या कारवाईवर परमबीर सिंहांची स्थगिती, ‘या’ अधिकाऱ्यांचं केलं भलं

बर्वेंच्या निवृत्तीनंतर अवघ्या दोन दिवसांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दुसऱ्याच दिवशी या कारवाईला स्थगिती दिली

Exclusive बर्वेंच्या कारवाईवर परमबीर सिंहांची स्थगिती, ‘या’ अधिकाऱ्यांचं केलं भलं
SHARES

माजी पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना न जुमानता ८ अधिकाऱ्यांनी परस्पर दहशतवादविरोधी पथक (एटीएस)मध्ये जाण्यासाठी पोलिस महासंचालकांकडे अर्ज केला होता. त्यावर शिस्त भंगाची कारवाई म्हणून बर्वे यांनी त्या ८ अधिकाऱ्यांचे आगामी वार्षिक वेतन १ वर्षासाठी रोखण्यात यावे याबाबत नोटीस दिली होती. मात्र बर्वेंच्या निवृत्तीनंतर अवघ्या दोन दिवसांनी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी दुसऱ्याच दिवशी या कारवाईला स्थगिती दिली आहे. 

 हेही वाचाः-बर्वेंनी केलेल्या बदल्या नव्या आयुक्तांनी आल्या आल्या थांबविल्या !

मुंबई पोलिस दलातील आयपीएस अधिकाऱ्यांमधील अंतर्गत वाद काही नवा नाही. मात्र बर्वे यांच्या कार्यकाळात नजरेस आला होता. बर्वे यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली. त्याच दरम्यान देवेन भारती यांची एटीएस प्रमुखपदाची नियुक्ती झाली होती. भारती यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलिस दलातील १२ अधिकाऱ्यांनी भारती यांच्यासोबत काम करण्यास मिळावे. यासाठी मुंबई पोलिस आयुक्त संजय बर्वे यांना डावलून थेट महासंचालकांकडे अर्ज केले. त्यावर १२ अधिकाऱ्यांनी बदलीसाठी केलेला अर्ज मुंबई पोलिस दलाच्या शिस्तप्रियतेला धरून नसल्याचा ठपका ठेवत आयुक्त संजय बर्वे यांनी १२ जणांंना कारणे दाखवा नोटीस बजावली.  या नोटीसांमुळे पोलिस दलातील वाद चव्हाट्यावर आला. आयुक्तांच्या कडक पवित्र्यामुळे मुंबई पोलिसांत खळबळ उडाली. या अधिकाऱ्यांचा आगामी काळातील १ वर्षाचा वेतन रोखण्याचे आदेश बर्वे यांनी दिले होते. 

 हेही वाचाः- पहिल्याच दिवशी आयुक्तांनी अंडरवर्ल्ड विरोधात फास आवळला.

बर्वे यांनी काढलेल्या आदेशाला नवनिर्वाचित पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्थगिती दिली आहे. बर्वेंनी १२ अधिकाऱ्यांनी बदलीसाठी केलेला अर्ज मुंबई पोलिस दलाच्या शिस्तप्रियतेला धरून नसल्याचा ठपका ठेवत पाठवलेल्या नोटीसीला वरील अधिकाऱ्यांनी उत्तर दिले होते. अधिकाऱ्यांनी पाठवलेली उत्तरामधील मुद्दे समर्थनिय वाटत असल्याचे सांगत, परमबीर सिंह यांनी १२ अधिकाऱ्यांच्या शिक्षेत बदल करून त्या अधिकार्यांचे वेतन न रोखण्याचे आदेश दिले आहेत.  


या कर्तबगार अधिकाऱ्यांचा समावेश

बर्वेंनी शिक्षा सुनावलेल्या याच अधिकाऱ्यांनी एकेकाळी गुन्हे शाखेत कार्यरत असताना मुंबई गुन्हे शाखेचा गुन्हेगारांवर चांगलाच वचक ठेवला होता. मुंबईत आतापर्यंत महत्वाच्या अनेक गुन्ह्यांचा तपास हा या १२ अधिकाऱ्यांनी करत, आरोपींना तुरूंगात डांबलं आहे. त्यात प्रामुख्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन अलकनुरे, दिनेश कदम, पोलिस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, ज्ञानेश्वर वाघ, दया नायक, सुधीर दळवी, सहाय्यक पोलिस निरीक्षक बने, विशाल गायकवाड, दिपाली कुलकर्णी, लक्ष्मीकांत साळुंखे, विल्सन राॅड्रीग्स, अश्वीनी कोळी यांची नावे आहेत.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा