पहिल्याच दिवशी आयुक्तांनी अंडरवर्ल्ड विरोधात फास आवळला.

आयुक्तपदाचा पदभार स्विकारताच अंडरवर्ल्डशी संबधित आरोपींची धरपकड करण्याचे आदेश देत, कुख्यात गुंड रवी पुजारीचा ताबा मिळवण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिलेत

पहिल्याच दिवशी आयुक्तांनी अंडरवर्ल्ड विरोधात फास आवळला.
SHARES
पोलिस दलातील एक डायनामिक अधिकारी म्हणून ओळख असलेले मुंबईचे नवनियुक्त पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी पदभार स्विकारताच अंडरवर्ल्डची पाळेमुळे खोदून काढण्यास सुरूवात केली आहे. मूळातच मुंबईतील अतिरेकी कारवाई, गँगवार संपवण्यात परमबीर सिंह यांचा मोठा वाटा आहे. गवळी गँग संमपवणाऱ्या विजय साळसकर आणि प्रफुल भोसले  अधिकाऱ्यांनी कुख्यात गुंडाना यम सदनी धाडले ते परमबीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखालीच, कारण परमबीर हे त्यावेळी परिमंडळ 2 चे पोलिस उपायुक्त होते. परमबीर हे कोणतेही काम अर्धवट सोडत नाहीत. म्हणूनच की काय आयुक्तपदाचा पदभार स्विकारताच अंडरवर्ल्डशी संबधित आरोपींची धरपकड करण्याचे आदेश देत, कुख्यात गुंड रवी पुजारीचा ताबा मिळवण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिलेत. तर या पुढे या गुंडांची चौकशी ही ते स्वत: करणार आहेत.

मुंबई पोलिस आयुक्तपदाची सूञ हाती घेतल्यानंतर परमबीर सिंह यांनी प्रथम शहरातील कायदा व सुव्यवस्थे सोबतच अंडरवर्ल्डशी संबधित गुन्ह्यांबाबत फास आवणार असल्याचे संकेत दिले होते. त्यानुसार परमबीर यांनी तातडीने कुख्यात गुंड रवि पुजारीचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते. रवी पुजारीला नुकतीच सेनेगलमध्ये अटक करण्यात आली होती. त्याला मागच्या आठवड्यातच भारतात आणल्यानंतर त्याचा ताबा प्रथम कर्नाटक पोलिसांना देण्यात आला. कर्नाटकमध्ये रवीवर बंगळूरूत 39, मेंगलोरमध्ये 36, उडुपीत 11, हुबळी- धारवाज, कोलार, शिवमोगा येथे प्रत्येकी एक अशी  एकूण 90 गुन्ह्यांची नोंद आहे.  त्या खालोखाल गुजरातमध्ये 75 गुन्ह्यांची नोंद आहे. तर दोन्ही राज्यांच्या तुलनेत त्याच्यावर महाराष्ट्रात  49 गुन्ह्यांची नोंद आहे. माञ या 49 गुन्ह्यात तक्रार करणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गजांची नावे आहेत. 

तर दाखल गुन्ह्यातील 26 गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. पुजारी सध्या कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात आहे.  त्यामुळे कर्नाटक पोलिसांकडून वर्षभराहून अधिक काळ पुजारीचा ताबा मुंबई पोलिसांना मिळणार नाही. म्हणूनच कर्नाटकातील काही महत्त्वाच्या गुन्ह्यांत त्याला अटक केल्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले आहेत. 

पुजारीच्या विरोधात गुजरातमध्येही सुमारे 75 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गुजरातने त्याचा आधी ताबा घेतल्यास मुंबई पोलिसांना आणखी वाट पाहावी लागेल. मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने गुन्हेगारी विश्‍वातील हालचालींची तातडीने माहिती घेणे आवश्‍यक आहे. त्यासाठी रवी पुजारी याच्या चौकशीतून अनेक महत्त्वाचे खुलासे होई शकतील. म्हणून गुन्हे शाखेने तात्काळ पुजारीचा ताबा घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना पोलिस आयुक्तांनी केली आहे.  रवी पुजारीने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनाही धमकावले होते. 2017-18 मध्ये अनेकांनी त्याच्याकडून धमकीचे फोन येत असल्याच्या तक्रारी दाखल केल्या. 2009 ते 2013 दरम्यान पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांना धमकावल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या महत्वांच्या गुन्ह्यांच्या तपासा करता, रवी पुजारीचा ताबा मिळवणे महत्वाचे असल्याचे सांगितले जात आहे.

परमबीर सिंह यांची उत्कृष्ठ कामगिरी

0 90 च्या दशकात एन्काऊंटर स्काँडचे यशस्वी अधिकारी

0 मालेगाव स्फोटाचे तपास अधिकारी

0 ड्रगमाफिया विकी गोस्वामीच्या अमली पदार्थाच्या कारखान्यांवर छापे

0 कुख्यात गुंड दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला खंडणीच्या गुन्ह्यात अटक

0 बोगस काँलसेंटरचा पर्दाफाश









संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा