Advertisement

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार आरामदायी

मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी करण्यासाठी एक्स्प्रेस गाडयांना एलएचबी डबे जोडण्यात येत आहेत.

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार आरामदायी
SHARES
मुंबई ते पुणे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता मुंबई ते पुणे मार्गावरील रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित व आरामदायी करण्यासाठी एक्स्प्रेस गाडयांना एलएचबी डबे जोडण्यात येत आहेत. इंद्रायणी व इंटरसिटी एक्स्प्रेसनंतर आता डेक्कन एक्स्प्रेसला या प्रकारातील डबे जोडण्यात येणार आहेत.

एलएचबी डबे जोडलेली ही एक्स्प्रेस नव्या रूपात येत्या गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यानंतर सिंहगड, डेक्कन क्वीन एक्स्प्रेसलाही ‘एलएचबी’ डबे जोडले जाणार असल्याची माहिती मिळते.  देशभरातील एक्स्प्रेस, पॅसेंजर गाडय़ांना ‘एलएचबी’ डबे जोडले जात आहेत. या डब्यांमुळे प्रवास अधिक सुरक्षित होतो. 

प्राणांतिक अपघात रोखण्यासाठी किंवा त्याचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी ‘एलएचबी’ डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला. इंद्रायणी, इंटरसिटी या दोन एक्स्प्रेसनंतर आता डेक्कन एक्स्प्रेसलाही एलएचबी डबे जोडले गेले आहेत.

ही एक्स्प्रेस ५ मार्चपासून नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत येईल. याआधी डेक्कन एक्स्प्रेस १७ डब्यांची होती. एलएचबीमुळे एक डबा कमी होणार आहे. मात्र डब्यातील प्रवासी क्षमता वाढणार आहे. तसच डब्यातील अंतर्गत सजावटही आकर्षक असणार असून, त्याचबरोबर डेक्कन क्वीनलाही असेच नवीन डबे जोडले जाणार आहेत.

‘एलएचबी’ म्हणजे लिंके हॉफमन बुश. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पूर्वी रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीत साध्या पद्धतीचे डबे एक्स्प्रेस गाडय़ांसाठी तयार केले जात होते. एखादा अपघात झाल्यास त्यात जीवितहानी अधिक होते.  ‘एलएचबी’ डबे तयार करण्याचा निर्णय झाला कारण हे डबे हलके असून यातील प्रवास सर्वाधिक सुरक्षित आहे.

मुंबई ते पुणे मार्गावरील सर्वच एक्स्प्रेस गाडय़ांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार इंद्रायणी, इंटरसिटी एक्स्प्रेसला एलएचबी डबे जोडले. त्यामुळे या एक्स्प्रेसमधील प्रत्येक डब्यामागे आसनक्षमता आता १२ ने वाढली आहे. या डब्यांमुळे प्रवास सुरक्षित झाला आहे. तसेच डब्यांचे अंतर्गत सौंदर्यही वाढले आहे. आता डेक्कन एक्स्प्रेसलाही हे डबे जोडण्यात आले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा