चिमुकलीचं अपहरण सीसीटीव्हीत कैद

 Bandra East
चिमुकलीचं अपहरण सीसीटीव्हीत कैद

वांद्रे - दिवसाढवळ्या झालेल्या एका चिमुकलीच्या अपहरणामुळे वांद्र्यातल्या बेहरामनगरमध्ये खळबळ उडाली आहे. ही मुलगी त्याच परिसरात राहणारी असून तिच्या घरासमोरच झालेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकरणी वांद्र्यातल्या निर्मलनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या अडीच वर्षाच्या मुलीचं नाव शिफा शेख आहे. 9 फेब्रुवारीला शिफा आणि तिच्या लहान बहिणीला घेऊन त्यांची आई बँकेत गेली होती. मात्र तिथून परतल्यानंतर आईने शिफाला तळमजल्यावर पायऱ्यांकडे थांबण्यास सांगत घराचा दरवाजा उघडण्यासाठी म्हणून पहिल्या मजल्यावर चार महिन्याच्या मुलीला घेऊन दार उघडण्यासाठी गेली. कारण दोघांना एकत्रित घेऊन जाणे शक्य नव्हते. याच दरम्यान तिचं अपहरण झालं.

Loading Comments