मुंबई युनिवर्सिटीला बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा विद्यार्थीच

कॅम्पस बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा विद्यार्थीच असल्याचं निष्पन्न झालं आहे.

मुंबई युनिवर्सिटीला बॉम्बनं उडवण्याची धमकी देणारा विद्यार्थीच
SHARES

मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम अभ्यासक्रमाचा निकाल लवकर न लावल्यास कॅम्पस बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देणारा विद्यार्थीच असल्याचं निष्पन्न झालं आहे. प्रलंबित निकालामुळे मानसिक तणावात असलेल्या विद्यार्थ्यानेच शिवीगाळ करणारा ईमेल पाठवला होता. वॉर्निंग आणि नोटीस देत त्याne सोडून देण्यात आलं.

नऊ आणि दहा जुलैला आलेल्या या ईमेल प्रकरणी मुंबईतील बीकेसी पोलिसात शुक्रवारी एफआयआर दाखल करण्यात आला होता. कॉमर्सच्या विद्यार्थ्यानं सायबर कॅफेमधून हा धमकीचा ईमेल पाठवला होता. तपासात हा मेल खोट्या तपशिलांच्या आधारे तयार करण्यात आलेल्या ईमेल आयडीवरुन पाठवलेला बनावट मेल असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर पोलिसांनी तपास करत आरोपीला ताब्यात घेतलं. मात्र तो विद्यार्थी असून मानसिक तणावातून त्यानं हे कृत्य केल्यानं नोटीस देऊन त्याला सोडून देण्यात आलं.

नुकतंच मुंबईतील सीएसएमटी, दादर, भायखळा आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या जुहूमधील बंगल्याजवळ बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन मुंबई पोलिसांना आला होता. त्यानुसार या सर्व ठिकाणी मुंबई पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकाकडून शोधमोहीम घेण्यात आली, मात्र ती अफवा असल्याचं स्पष्ट झालं.

मुंबई विद्यापीठानं आपल्या सर्व शैक्षणिक विभागांतील अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे, विद्यापीठामध्ये पहिल्यांदाच सर्व शैक्षणिक विभागांतील पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश हे केंद्रीय पद्धतीनं करण्यात येणार आहेत. याची १२ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे.



हेही वाचा

यूपीएससीकडून २०२२ च्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

खाजगी शाळांच्या फीमध्ये १५ टक्के कपात, अखेर जीआर निघाला

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा