लैंगिक अत्याचारप्रकरणी मोहम्मद कुरेशीला अटक

 Malad West
लैंगिक अत्याचारप्रकरणी मोहम्मद कुरेशीला अटक

मालवणी - जुन्या हिंदी चित्रपटात स्टंटमॅनची भूमिका करणाऱ्या मोहम्मद कुरेशी (50) याने चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी रविवारी मालवणी पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपी कुरेशीने त्याच्या नातीसोबत खेळणाऱ्या शेजारील 5 वर्षांच्या चिमुकलीशी अश्लील चाळे केले. पीडित मुलगी आरोपीच्या घरातून रडत बाहेर आली. तेव्हा तिच्या आईने तिला रडण्याचं कारण विचारले असता, सदर प्रकार उघडकीस आला. तसंच तो नेहमी असं वागत असल्याचं मुलीनं आईला सांगितलं. याप्रकरणानंतर पीडित मुलीच्या आईने मालवणी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर मालवणी पोलिसांनी कुरेशीला पोस्को कायद्यांतर्गत अटक केली. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपी कुरेशीला पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती मालवणी पोलिसांनी दिली.

Loading Comments