मुंबईच्या आरे काॅलनी पोलिसांनी प्रेमप्रकरणातून हत्या करण्यात आलेल्या मर्डर मिस्ट्रीचा छडा लावला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुबारक प्यारेजहान सय्यद (२१), अमित उर्फ बिडी सीयाराम शर्मा (२३) या दोघांना अटक केली आहे. मुबारकचे प्रेम असलेल्या तरुणीसोबत त्याचाच मित्र मृत रवी भगवान साबदे बोलत असल्याचे कळाल्यानंतर राग अनावर झालेल्या मुबारक आणि अमितने रवीची आरेच्या जंगलात निर्घुण हत्या केली. सध्या दोघंही पोलिसांच्या ताब्यात आहेत.
हेही वाचाः- रेस्टॉरंट आणि बार परवाना शुल्कात ५० टक्क्यांची कपात
मुंबईच्या जोगेश्वरी परिसरातील जे.व्हिएलआर रोड परिसरात मुबारक आणि रवि हे एकत्र रहात होते. त्याच परिसरातील एका तरुणीसोबत मुबारकची मैत्री झाली होती. दोघंही एकमेंकासोबत मोबाइलबर बोलायचे. हे माहित असतान देखील रवी हा तरुणीशी जवळीकता साधत होता. त्यामुळे संबधित तरुणी मुबारकशी बोलणं टाळू लागली. याचा राग मुबारकच्या मनात होता. त्या सुडेच्या भावनेतूनच त्याने मित्र अमित याला हाताशी धरून रवीचा काटा काढण्याचे ठरवले. त्यानुसार जून महिन्यात या दोघांनी रवीला आरेच्या जंगलात निर्जनस्थळी गाठून त्याला मारहाण केली. या मारहाणीत रवीचा मृत्यू झाला. रवीची ओळख पटू नये यासाठी दोघांनी त्याच्या तोंडावर दगडाने प्रहार करून त्याला विद्रुप केले.
हेही वाचाः- राज ठाकरेंना कोर्टाकडून नोटीस, मनसे-अॅमेझॉन वाद चिघळला
ऐवढ्यावरच न थांबता पुरावा नष्ठसाठी त्या दोघांनी रविचा मोबाइलही दगडाने ठेचून काढला. तसेच त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याला नग्न अवस्थेत जंगलातील वाहत्या पाण्याच ढकलून पळ काढला. कित्येक तास उलटले तरी रवी घरी न आल्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी रवी बेपत्ता असल्याची तक्रार आरे काँलनी पोलिस ठाण्यात नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. पोलिसांना तपासा दरम्यान रवी आणि मुबारक यांच्यात संबध ठिक नव्हते याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुबारक आणि अमित या दोघांची चौकशी केली. त्यावेळी दोघंही विसंगत मागीतीदेऊन दिशा भूल करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी खाकीचा धाक दाखवल्यानंतर दोघांनी आपल्या गुन्ह्यांची कबूली दिली. तब्बल सहा महिन्यानंतर हा क्लिष्ठ गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणल्यामुळे त्याचे सर्वच स्तरावरून कौतुक केले जात आहे.