राकेश मारिया निवृत्त


राकेश मारिया निवृत्त
SHARES

मुंबई - वादग्रस्त ठरलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया 31 जानेवारीला 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. राकेश मारियांनी आपल्या कारकिर्दीत अनेक चढ उतार पहिले. मोठं मोठ्या केसेस त्यांनी हाताळल्या. या केसेसचा छडा लावताना कधी यश आले, तर कधी त्यांना अपयशाला देखील सामोरे जावे लागले.

शीना बोरा प्रकरण आणि गमवावं लागलेलं आयुक्तपद

गेल्या काही काळापासून मारिया चर्चेत आहेत ते शीना बोरा प्रकरणात त्यांनी घेतलेल्या पुढाकाराने. या केसचा त्यांनी जातीने तपास केला खरा, पण त्याची चांगलीच किंमत त्यांना मोजावी लागली. या प्रकरणात जातीने लक्ष दिल्याने तसेच पीटर मुखर्जीया याला पाठीशी घातल्याचा ठपका ठेवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारियांना मुंबई पोलीस आयुक्तपदावरून बाजूला केले. पण आपल्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी मारिया हे ऐकण्यास तयार नाहीत. सीएम साहेबांनी कधीही माझं नाव घेतलं नाही आणि माझ्या बदलीची मागणी ही मी स्वतः केल्याचे मारियांनी सांगितले.

"शीना बोरा केस दरम्यान जे काही झाल त्याच कोणतही रिग्रेट नाही. सीएम साहेबांनी कधीही माझं नाव घेतलं नाही. बदलीची मागणी ही मी स्वतः केली होती," असे स्पष्टीकरण राकेश मारिया यांनी दिले.

26/11 मुंबई हल्ला

"26/11च्या हल्ल्यात जे अधिकारी हुतात्मा झाले, जखमी झाले त्यांचा सन्मान झाला. मात्र इतरांनी देखील काम केले. दुर्देवाने माझी ड्युटी कंट्रोल रुमला लागली होती. 26/11 च्या हल्यात जखमी किंवा हुतात्मा न झाल्याचे मला आजही दु:ख आहे," असे मारियांनी स्पष्ट केले.

अरुण गवळीला गजाआड करण्यात मिळालेले यश

डॉन अरुण गवळीला ज्या हत्येप्रकरणी सजा लागली त्या कमलाकर जामसंडेकर प्रकरणाचा तपास हा देखील मारियांच्या देखरेखीखाली झाला होता. याचे समाधान मारियांना शेवटपर्यंत असले.

 

मारियांना कसली आहे खंत?

दादर येथे कित्येक वर्षांपूर्वी पिंगले नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. त्या हत्येचा आरोपी आजतागायत मोकाट आहे. ही केस ओपन न झाल्याची आजही मारियांना खंत आहे.

निवृत्ती नंतरचे प्लॅन
आपल्या करियरचा म्हणा आयुष्याचा म्हणा एक लेखाजोखा मारिया आपल्या पुस्तकातून मांडणार आहेत. एवढेच नाही तर खेळाच्या क्षेत्रात काम करण्याचा देखील मारियांचा प्लॅन आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय