अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या मुलाच्या अडचणीत वाढ


अभिनेता मिथुन चक्रवर्तीच्या मुलाच्या अडचणीत वाढ
SHARES

बॉलीवुड अ‍ॅक्टर मिथुन चक्रवर्तीची(Mithun Chakraborty) पत्नी योगिता बाली आणि मुलगा महाक्षय उर्फ मेमोवर बलात्कार, चिटींग आणि जबरदस्तीने अबॉर्शन केल्याचा गुन्हा मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पीडित तरूणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित तरूणी आणि महाक्षय २०१५ पासून रिलेशनशिपमध्ये होते. (Mithun Chakraborty)महाक्षयने या दरम्यान पीडित तरूणीला लग्न करणार असल्याचे सांगून पीडितेसोबत शारीरीक संबंध ठेवले.

पोलिसात दिलेल्या तक्रारीत पीडितेने म्हटले आहे की, २०१५ मध्ये महाक्षयने पीडित तरूणीला घरी बोलावले आणि तिला सॉफ्ट ड्रिंकमध्ये नशेचे औषध पाजले आणि या दरम्यान महाक्षयने पीडितेशी कोणत्याही कन्सेन्टशिवाय तिच्यासोबत फिजिकल रिलेशन ठेवले आणि नंतर लग्न करणार असल्याचे सांगत नाटक करत राहीला. महाक्षयने ४ वर्षापर्यंत पीडितेसोबत शारीरीक संबंध ठेवले आणि तिचा शारीरिक, मानसिक छळ केला.


पीडितेनुसार, जेव्हा ती या रिलेशनशिपमुळे गरोदर राहिली तेव्हा महाक्षयने तिच्यावर अबॉर्शन करण्यासाठी दबाव आणला आणि जेव्हा तिने मान्य केले नाही, तेव्हा तिला जबरदस्तीने काही गोळ्या देऊन तिचे ऑबर्शन केले. पीडितेचे म्हणणे आहे की, तिला देण्यात येणार्‍या गोळ्यांमुळे तिचे अबॉर्शन होईल हे तिला माहित नव्हते. पीडितेचे म्हणणे आहे की, महाक्षयची आई आणि अ‍ॅक्टर मिथुन चक्रवर्तीच्या पत्नीने पीडितेच्या तक्रारीनंतर तिला धमकी दिली होती आणि प्रकरण मिटवण्यासाठी दबाव आणला.

पीडितेने अगोदरही या प्रकरणी एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु, तेव्हा मुंबई पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही. या दरम्यान पीडित तरूणी दिल्लीला शिफ्ट झाली, जेथे तिने दिल्लीच्या रोहिणी कोर्टात एफआयआर दाखल करण्यासाठी अपील केले होते. ज्यामध्ये प्राथमिक पुराव्यांच्या आधारावर कोर्टाने प्रकरणात एफआयआर दाखल करणे आणि प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश दिला होता. यानंतर मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Read this story in English
संबंधित विषय