सुशांत सिंहच्या वडिलांचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप

मुंबई पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत २५ फेब्रुवारी रोजी सुशांतच्या वडिलांनी कोणतिही तक्रार केली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

सुशांत सिंहच्या वडिलांचे मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप
SHARES

सुशांत सिंह राजपूत आत्महत्येच्या तपासावरून मुंबई पोलिसांवर सुशांतचे वडिल केके.सिंह आणि वकिल विजय यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. माझ्या मुलाच्या जिवाला धोका आहे. हे मी पोलिसांना २५ फेब्रुवारी रोजी तक्रारीद्वारे कळवले होते. मात्र सांगून सुद्धा मुंबई पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आजही पोलिस चुकीच्या पद्धतीने तपास करत असून मुख्य आरोपी मोकाटच असल्याचा आरोप सुशांतचे वडिल के.के.सिंह यांनी केला आहे. तर मुंबई पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत २५ फेब्रुवारी रोजी सुशांतच्या वडिलांनी कोणतिही तक्रार केली नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचाः- सुशांत आत्महत्या प्रकरण ! बिहार पोलिसांचा तपास ठप्प, ‘ते’ ४ अधिकाऱीही क्वारंटाईन

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन खुलासे समोर येत आहे. सुशांत सिंहचे वडिल केके सिंह यांनी बिहार पोलिसात रिया चक्रवर्ती विरोधात केलेल्या तक्रारीनंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. त्यात केके सिंहयांनी सुशांतच्या जिवाला धोका असल्याबाबत मुंबई पोलिसांना २५ फेब्रुवारी रोजी वांद्रे पोलिसात पत्र लिहून कळवले होते. मात्र पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. एवढेच नाही, तर पोलिस मुख्य आरोपींची चौकशी न करता विनाकारण या गुन्ह्यांत ज्या व्यक्तींचा सहभाग नाही त्यांची चौकशी करण्यात वेळ काढत असल्याचा आरोप देखील करत आहे. तर दुसरीकडे मुंबई पोलिसांनी हे सर्व आरोप चुकीचे असल्याचे सांगत आहे, सुशांच्या वडिलांनी कोणतेही पत्र पोलिसांना लिहिलेच नसल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहेत. तर आमचा तपास योग्य पद्धतीने सुरू आहे. १६ जूनला दोन बहिणी आणि त्यांचे पती यांचा जबाब घेण्यात आला होता. त्यांच्या जबाबात कुठेच कोणावरही संशय घेण्यात आलेला नव्हता. त्यात सुशांत मानसिक आजारासाठी उपचार घेत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्याच्या डॉक्टरांचे डॉक्युमेंटही मिळाले आहेत. नंतर आम्ही त्यांच्या बहिणींना चौकशीसाठी बोलावलं होतं, पण त्या आल्या नाहीत. कुटुंबियांनी एकदा जबाब नोंदवला, परंतु नंतर बोलावल्यावर ते आल्या नसल्याचे पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी स्पष्ट केले.

हेही वाचाः- सुशांत आत्महत्या प्रकरण! तपासासाठी आलेल्या अधिकाऱ्याला केलं १५ दिवसांसाठी क्वारंटाईन

दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात ५६ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तसंच १३ आणि १४ जूनचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजही आम्ही जप्त केले आहेत. परंतु पार्टी झाल्याचा एकही पुरावा आम्हाला मिळालेला नाही. सखोल तपास सुरु आहे परंतु पोलीस निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत. नैसर्गिक मृत्यू आणि संशयास्पद मृत्यू या दोन्ही बाजूने तपास केला जात आहे. तसेच रिया चक्रवर्तीचा ही दोन वेळा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच बिहारचे पोलिस अधिक्षक विनय तिवारी यांना पालिकेने क्वारनटाईन केलं आहे. त्याचा आमच्याशी काहीही संबध नसल्याचे सांगत परमबिर सिंह यांनी विषयाला बगल दिली. सोमवारी मुंबई पोलिस आयुक्त परमबिर सिंह यांनी काही सिलेक्टिव प्रसार माध्यमांना बोलवून ही माहिती दिली. मात्र त्यानंतर सर्वच स्तरावरून त्यांच्यावर टिका होऊ लागल्यानंतर त्यांनी एक प्रेसनोट काढून मौन बाळगले.

संबंधित विषय