Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,69,292
Recovered:
46,54,731
Deaths:
78,857
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,649
1,946
Maharashtra
5,33,294
42,582

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर पोलिस काय म्हणाले?

अभिनेता सुशांत सुंह राजपूतच्या आत्महत्येवर पोलिसांनी दिली 'ही' प्रतिक्रिया

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर पोलिस काय म्हणाले?
SHARES

बॉलिवूडमधून अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनयाची सुरुवात करणारा अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) राजपूतनं मुंबईमधील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अद्याप या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. पण पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. वांद्रे पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सुशांतनं आत्महत्या केली त्यावेळी त्याचे मित्र देखील घरात होते. सकाळी मित्रांनी आवाज दिला असता त्यानं दरवाजा उघडला नाही. दरवाजा तोडला तेव्हा सुशांतचा मृतदेह आढळला. सुशांतच्या घरात काही कागदपत्रे देखील सापडली आहेत, ज्याद्वारे समजते की, तो नैराश्यावर (Depression) उपचार करीत होता.

सुशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विले पार्ले इथल्या कूपरला नेण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल अल्यानंतरच खरं कारण समजू शकले. पोलिस (MUmbai Police) त्याच्या घरात तपास करत आहेत. आत्महत्येपूर्वी त्यानं काही सुसाईड नोट लिहली आहे की नाही याचा तपास सुरू आहे. 

याप्रकरणी पोलिस उपायुक्त प्रणय अशोक म्हणाले की, सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केली आहे. आम्ही याप्रकरणी अधिक तपास करत आहोत. आम्हाला कुठलीही सुसाईड नोट अजून मिळाली नाही.

काही दिवसांपूर्वी त्याच्या माजी मॅनेजरनं आत्महत्या केली होती. पाच दिवसांपूर्वी याप्रकरणी सुशांत सिंह राजपूतची देखील चौकशी करण्यात आली होती. त्यामुळे पोलिस या दोन घटनांचा काही संबंध आहे की नाही याचा पण तपास करत आहेत.

पण गेले सहा महिने सुशांत सिंह राजपूत तणावात, नैराश्यात होता, असं बोललं जातंय. पण यामागचं नेमकं कारण कळू शकलं नाही. त्याच्या आत्महत्येनं सर्वांनाचा धक्का दिला आहे. एवढ्या चांगल्या अभिनेत्यानं हे पाऊल का उचललं? हाच प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. अक्षय कुमार, संजय दत्त, राम गोपाल वर्मा यांच्यासोबत अनेकांनी ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे. यासोबतच राजकीय वर्तुळात देखील त्याच्या निधनावर दु:ख व्यक्त करण्यात आलं आहे.

सुशांतची आत्महत्या बॉलिवूडसोबतच त्याच्या कुटुंबियांसाठी धक्कादायक आहे. त्याच्या कुटुंबियांपैकी काहींनी त्याच्या आत्महत्येची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. कारण त्यांच्यानुसार सर्व काही ठिक असताना त्यानं आत्महत्या का केली? हा प्रश्न कुटुंबियं आणि नातेवाईकांना सतावत आहे.  हेही वाचा

धक्कादायक! बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची आत्महत्या

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनं बॉलिवूड हादरलं


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा