Advertisement

सुशांत सिंह राजपूतच्या व्हिसेरा रिपोर्टमधून 'हे' सत्य समोर

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदन अहवालानंतर आता त्याचा अंतिम व्हिसेरा रिपोर्ट मंगळवारी संध्याकाळी समोर आला.

सुशांत सिंह राजपूतच्या व्हिसेरा रिपोर्टमधून 'हे' सत्य समोर
SHARES

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या शवविच्छेदन अहवालानंतर आता त्याचा अंतिम व्हिसेरा रिपोर्ट मंगळवारी संध्याकाळी समोर आला. त्याचा मृत्यूमागे संशयास्पद कारण नसल्याचं यात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे. सुशांतच्या आत्महत्येवर अनेकांनी संशय व्यक्त केला होता.

सुशांतच्या व्हिसेरा रुपोर्टमधून शरीरात कोणत्याही प्रकारचे संशयित रसायन किंवा विषारी पदार्थ आढळून आला नसल्याचं समोर आलं आहे. व्हिसेरा रिपोर्टमध्ये सांगितल्यानुसार, 'मृत्यूच्या आधी कोणत्याही संघर्षाचे किंवा झटापटीचे संकेत मिळालेले नाहीत. तसंच सुशांतच्या नखांमध्येही काहीच आढळून आलेलं नाही.'

सुशांत सिंहचा अंतिम शवविच्छेदन अहवाल गेल्या आठवड्यात आला होता. त्यामध्ये सांगितलं होतं की, सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरून झाला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्ट पाच डॉक्टरांच्या टीमनं तयार केला होता. तर याआधी आलेल्या प्रोव्हिजन पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्येही सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यामुळे श्वास गुदमरून झाल्याचं सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी मंगळवारी वांद्रे पोलिसांनी सुशांतची ‘दिल बेचारा’ चित्रपटातील अभिनेत्री संजना सांघी हिची तब्बल ७ तास चौकशी केली. सुशांतचा हा शेवटचा चित्रपट होता. खरतर संजनाला पोलिसांनी चौकशीसाठी सोमवारी बोलावले होते. मात्र नवी दिल्लीत एका चित्रपटाच्या शुटींगमध्ये ती व्यस्त असल्याने ती मंगळवारी पोलिस ठाण्यात चौकशीस हजर राहिली.

काही महिन्यांपूर्वी 'मी-टू कैम्पेन' सुरू असताना संजनानं सुशांतवर तिची छेड काढल्याचा आरोप केला होता. त्यावेळी तिनं सुशांतसोबत चॅटचे फोटो ही सोशल मिडियावर टाकल्याचं कळतंय. मात्र सुशांतनं या आरोपांचं खंडन केलं होतं.हेही वाचा

बॉलिवूडमधील दुजाभाव पुन्हा समोर, कुनाल खेमू, विद्युत जामवाल संतप्त


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा