सुशांत सिंह राजपूत प्रकरण: ईडीचा तपास थांबला

ईडीच्या कार्यालयात एका अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आल्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपास थांबवल्याचे कळते.

सुशांत सिंह राजपूत प्रकरण: ईडीचा तपास थांबला
SHARES

सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास ईडी, सीबीआय आणि एनसीबी या तीन केंद्रीय संस्था करत असताना. अचानक ईडीच्या कार्यालयात एका अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्यामुळे  ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपास थांबवल्याचे कळते. या हत्येच्या तपासासाठी सीबीआयने एक विशेष पथक नेमले आहे. 

 हेही वाचाः- गिरगावमध्ये खचला रस्ता, 'हा' मार्ग वाहतुकीसाठी बंद

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात सुशांतची मॅनेजर श्रुती मोदीला ईडी ने बुधवारी चौकशीसाठी बोलण्यात आले होते. या चौकशीपूर्वी एका अधिकाऱ्याला अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्याची कोरोना चाचणी करण्यात आली. या चाचणीत त्याचा कोरोनाला अहवाल पाँझिटिव्ह आला. त्यानंतर संबधितक अधिकाऱ्याला अलगीकरणात ठेवण्यात आले. तसेच कोरोना संक्रमण झालेल्या अधिकाऱ्याच्या संपर्कात असलेल्या अधिकाऱ्यांनीही स्वतःला विलगीकरण केल्याने, या प्रकरणाचा तपास काही दिवसांसाठी थांबवणयात आल्याचे समजते. रियाच्या चौकशीत श्रुती मोदी आणि जया सहा या दोघांची नावे आल्यानंतर एनसीबीच्याही ते रडारवर आले होते.  

हेही वाचाः- लोकलच्या प्रवासी संख्येत वाढ, फेऱ्या मात्र कमीच

दरम्यान आज सुशांत सिंह राजपूतच्या विसेरा रिपोर्ट मिळणार असल्याचे कळते. या विसेरा रिपोर्टमध्ये सुशांत सिंह राजपूतने नक्की आत्महत्या केली की, त्याची हत्या झाली. हे कळणार असल्याचे कळते. त्यामुळे या रिपोर्टमधून आता काय खुलासा होता. त्यावर आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा