तो, ती आणि संशय...


तो, ती आणि संशय...
SHARES

कांदिवली - चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर हल्ला करणाऱ्या पतीला कांदिवली पोलिसांनी अटक केलीय. संजय जाधव असे या आरोपीचे नाव आहे. 23 जानेवारीला एस.व्ही. रोड येथील बँक ऑफ बडोदासमोर संजयने माधुरीवर चाकूने हल्ला केला. पण माधुरीने जखमी अवस्थेत तिकडून पळ काढला. जखमी अवस्थेतच ती शताब्दी रुग्णालयात दाखल झाली.

माधुरीचा पती तिच्यावर संशय घेत होता. ती घरातून बाहेर गेली तरी संजय तिचा पाठलाग करत असे. ती कामाला गेली तरी माधुरीवर तो नजर ठेवायचा. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद व्हायचे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 23 जानेवारीलाही संजय माधुरीचा पाठलाग करत होता. त्यावेळी त्याने तिच्यावर वार केला. पोलिसांनी संजय विरोधात पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा