शेजाऱ्यानेच शेजाऱ्यावर केला प्राणघातक हल्ला

 Cheetah Camp
शेजाऱ्यानेच शेजाऱ्यावर केला प्राणघातक हल्ला

ट्रॉम्बे - पूर्ववैमनस्यातून ट्रॉम्बे परिसरात राहणाऱ्या राहुल शेळके (25) या तरुणावर शेजारीच राहणाऱ्या तरुणानं प्राणघातक हल्ला केलाय. काही दिवसांपूर्वी राहुल यानं याच परिसरात राहणाऱ्या मोहन मालुसरे या तरुणाच्या कानशीलात लगावली होती. याचाच राग मनात धरून आरोपी मोहनने मंगळवारी रात्री राहुलवर तलवारीनं हल्ला केला. मात्र यामध्ये तो थोडक्यात बचावला असून आरोपीने त्याला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. राहुलने याबाबत आरोपीच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Loading Comments