'टकटक गँग'ची पुन्हा दहशत, शहिद अशोक कामटे यांच्या पत्नीची बॅग चोरीला

एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी विनिता या उतरल्या असताना. वनिता यांनी त्यांची बॅग कारमध्येच ठेवली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत फ्रान्सिस हे ही पैसे काढण्यासाठी उतरले. मॅरिएट कारमध्ये एकट्याच असताना. अचानक त्यांच्या खिडकीची काच अनोळखी व्यक्तीने वाजवत, मॅरिएट यांना पैसे खाली पडले असल्याचे त्याने सांगितले.

'टकटक गँग'ची पुन्हा दहशत, शहिद अशोक कामटे यांच्या पत्नीची बॅग चोरीला
SHARES

‘अहो, तुमचे पैसे पडले आहेत’, असे कुणी सांगितले तर पडलेले पैसे पाहण्याच्या नादात निर्धास्थ राहू नका. कदाचित तुमचे पैसे पडलेले नसतील. पण, तुमची एखादी मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकत्याच अशा भूरट्या चोरांनी शहिद अशोक कामटे यांच्या पत्नी विनीता कामटे यांची बँग चोरल्याची घटना पुढे आली आहे. या प्रकरणी वरळी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.  


'टकटक गँग'ची दहशत

 मुंबईत सोनसाखळी चोरांवर आवर घालण्यात पोलिसांना यश आले असले. तरी 'टकटक गँग' पून्हा सक्रीय झाली आहे. मुंबईकरांचे लक्ष विचलित करून त्यांना गंडवण्याचा नवा फंडा या चोरट्यांनी शोधून काढला आहे. दिवसेंदिवस अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून या चोरट्यांनी नुकतीच शहिद अशोक कामटे यांच्या पत्नीला वरळी परिसरात अशा प्रकारे गंडा घातल्याचे पुढे आले आहे. वरळी नाका येथे विनीता अशोक कामटे(५३) या त्यांची मैत्रिण मॅरिएट आराना व त्यांचे पती फ्रान्सिस आराना यांच्यासोबत कारमधून प्रवास करत होत्या. त्यावेळी जवळील एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी वनिता या उतरल्या असताना. वनिता यांनी त्यांची बॅग कारमध्येच ठेवली होती. त्यावेळी त्यांच्यासोबत फ्रान्सिस हे ही पैसे काढण्यासाठी उतरले. मॅरिएट कारमध्ये एकट्याच असताना. अचानक त्यांच्या खिडकीची काच अनोळखी व्यक्तीने वाजवत, मॅरिएट यांना पैसे खाली पडले असल्याचे त्याने सांगितले. 


लक्ष विचलीत करून केली फसवणूक

दहा रुपयांची नोट खाली पडली असल्याचे पाहिल्यानंतर मॅरिएट या नोट उचलण्यासाठी गाडीबाहेर आल्या, नोट उचलून ती नोट त्यांनी गाडीत ठेवली. त्याचवेळी विनिता या गाडीजवळ आल्या, त्यावेळी त्यांना गाडीच्या डॅशबोर्डावर ठेवलेली त्यांची बँग आढळून आली नाही. त्या भूरट्या चोरांनी मॅरिएट यांचे लक्ष विचलीत करून बँग चोरल्याचे विनिता यांच्या लक्षात आले. त्यानंतर विनीता यांनी पोलिस नियंत्रण कक्षाला फोन करत, या फसणूकीची माहिती त्यांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी विनिता यांनी वरळी पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वरळी पोलिसांनी दिली. या प्रकरणी घटनास्थळावरील सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असल्याचे  पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.  


सीसीटिव्हीद्वारे आरोपींची ओळख पटली

चोरीला गेलेल्या विनिता कामटे यांच्या बँगेत रोख रक्कम तीन हजार, पाकिट, हि-यांचे कानातले, कामटे आणि त्यांच्या मुलाची महत्त्वाची कागदपत्रे असा एक लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल होता.  तपासा दरम्यान काही अंतरावर विनिता कामटे यांची ती बँग आणि त्यातील कागदपत्रे पोलिसांना मिळाले. मात्र त्यातील मौल्यवान दागिने आणि पैसे चोरट्यांनी लंपास केले. याप्रकरणी संशयीत आरोपीची ओळख पटली असून लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असे वरळी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा