संगीत दिग्दर्शकाचा मोबाइल ‘टकटक गँग’ने चोरला


SHARE

मुंबईत टकटक गँगने पुन्हा एकदा डोके वर काढलं आहे. गाडीच्या काचेवर वाजवून लक्ष विचलीत करून कारमधील मौल्यवान वस्तूंची चोरी हे चोर करतात.  या गँगने जुहूत प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक डब्बू मलिकला गंडवल्याचे आता पुढे आले आहे. या प्रकरणी जुहू पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


सिग्नलला चोरी

संगीत दिग्दर्शक डब्बू मलिक हे वर्सोवा परिसरात राहतात. दोन दिवसांपूर्वी ते रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान त्यांच्या कारमधून जुहू तारा रोडवरून सांताक्रुझ चौपाटीच्या दिशेने जात होते. त्यावेळी एका सिग्नलला एका अनोळखी तरुणाने कारच्या काचेवर टकटक करत त्यांचे लक्ष विचलीत केले. त्याने डब्बू यांना बोलण्यात गुंतवून दुसऱ्या चोराने डब्बू यांच्या नकळत त्यांच्या डाव्या बाजूच्या सीटवर ठेवलेला मोबाइल चोरला. काही अंतरावर गेल्यानंतर डब्बू मोबाइल शोधत असताना त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली.


एकाच टोळीचा हात 

 या प्रकरणी डब्बू हे जुहू पोलिस ठाणे येथे तक्रार नोंदवत असताना डब्बू यांचा मोबाइल चोरीला गेल्याच त्याच ठिकाणी मोबाइल चोरीची दुसरी तक्रार घेऊन एक व्यक्ती आला होता. एका मागोमाग एक झालेल्या या चोरीत एकाच टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी जुहू पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा -

वज्रेश्वरी मंदिरावर दरोडा टाकणारे ५ दरोडेखोर जेरबंद
संबंधित विषय
ताज्या बातम्या