फ्लाइंग राणी एक्स्प्रेसमध्ये २ प्रवाशांकडून टीसीला बेदम मारहाण

पश्चिम रेल्वे मार्गांवरील एका टिसीला प्रवाशांनी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे.

फ्लाइंग राणी एक्स्प्रेसमध्ये २ प्रवाशांकडून टीसीला बेदम मारहाण
SHARES

पश्चिम रेल्वे मार्गांवरील एका टिसीला प्रवाशांनी बेदम मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. पश्चिम रेल्वेच्या अहमदाबाद ते मुंबई या मार्गावर धावणारी फ्लाईंग राणी एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडली आहे. या एक्स्प्रेसमध्ये २ प्रवाशांनी टिसीला मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी २ आरोपींना अटक केली असून, या घटनेत टीसी जखमी झाला आहे.

प्रवाशांनी रेल्वेचा टिसीला बेदम मारहान करण्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी समोर आली आहे. प्लाईंग राणी एक्स्प्रेस अहमदाबादवरुन मुंबईकडे येत होती. त्यावेळी सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास डाहणू रोड रेल्वे स्थानकांवर आली. तेव्हा चिन्मय जगन्नाथ बारी आणि धीरेंद्र ईश्वर पाटील हे २ प्रवासी रेल्वे गाडीत चढले.

यावेळी फ्लाईंग राणी एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर असलेले टिसी अर्जुंन सिंग यांनी या दोघांकडे तिकीटची विचारणा केली असता त्यांनी एमएसटी पास दाखवला. त्यानंतर टीसी आणि प्रवाशांचा दोघांत वाद निर्माण झाला. त्यानंतर केळवे रोड स्थानकांदरम्यान या २ प्रवाशांनी अर्जुंन सिंगवर हल्ला चढवला. ज्यात टीसी जख्मी झाला.

या घटनेनंतर अर्जुंन सिंगनं यांची तक्रार पोलीसांकडे केली. तेव्हा पोलिसांनी बोरीवली रेल्वे स्थानकांत या दोन्ही प्रवाशांना अटक केली. या २ आरोपीना पालघर लोहमार्ग पोलीस ठाण्यात घेउन गेले. तिथे त्यांच्या गुन्हा नोदविण्यात आलेल्या आहे. तसेच पालघर पोलीसांकडे यादोन्ही आरोपीला सपुर्द करण्यात आले आहे.

पालघर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. चिन्मय जगन्नाथ बारी आणि धीरेंद्र ईश्वर पाटील वांंद्रेचा एका खासगी हॉस्पिटलमध्ये कामाला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा