एटीएम लुटण्याचा प्रयत्न फसला


एटीएम लुटण्याचा प्रयत्न फसला
SHARES

वांद्रे - एका अज्ञातानं कॅश व्हॅन लुटण्याचा केलेला प्रयत्न एटीएमच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधनामुळे फसला. आयसीआयसीआय बँकेच्या पाली नाका एटीएमजवळ हा प्रकार घडला. या एटीएममध्ये पैसे भरण्याचं काम सुरू होतं. तेव्हा हा तरुण जवळ येण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला हटकलं असता, या तरुणानं चाकूचा धाक दाखवला. मात्र त्याला न घाबरता सुरक्षा रक्षकानं बंदूक काढल्यावर या चोरट्यानं पळ काढला. अद्याप आरोपीची ओळख पटू शकलेली नाही. याप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय